‘काम थांबले पाहिजे’ असे प्रत्येक जण म्हणतो, पण ‘काम सुरू करा,’ असे कोणीही म्हणत नाही- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 06:24 AM2019-12-06T06:24:14+5:302019-12-06T06:26:59+5:30

देशाचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे, असे गडकरी यांनी म्हटले.

Everyone says 'work should stop', but nobody says 'start work;' Nitin Gadkari's displeasure | ‘काम थांबले पाहिजे’ असे प्रत्येक जण म्हणतो, पण ‘काम सुरू करा,’ असे कोणीही म्हणत नाही- नितीन गडकरी

‘काम थांबले पाहिजे’ असे प्रत्येक जण म्हणतो, पण ‘काम सुरू करा,’ असे कोणीही म्हणत नाही- नितीन गडकरी

Next

नवी दिल्ली : विविध रस्ते प्रकल्पांच्या मार्गात जमीन अधिग्रहण आणि पर्यावरण मंजुरी यासारखे अडथळे निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे, असे गडकरी यांनी म्हटले.
गडकरी यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले की, सर्व खासदारांनी आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पाबद्दल जागरूक राहिले पाहिजे. रस्ते आणि पुलांच्या बांधकामाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यास खासदारांनी मदत केली पाहिजे; पण आपल्याकडे ‘काम थांबले पाहिजे.’असे प्रत्येक जण म्हणतो, पण ‘काम सुरू करा,’ असे मात्र कोणीही म्हणत नाही.
रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री गडकरी यांनी सांगितले की, जमीन अधिग्रहण आणि पर्यावरण मंजुरी हा रस्त्यांच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा आहे. मी पर्यावरणवादीच आहे. तथापि, पर्यावरण आणि विकास सोबतच चालले पाहिजेत.
शक्यता दर्शक अभ्यास, प्रकल्पाची व्यवहार्यता, प्राधान्यस्थिती आणि निधीची उपलब्धता यांचा पूर्ण अभ्यास करूनच प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

३४,८०० कि.मी. रस्ते बांधले जाणार
गडकरी यांनी सांगितले की, भारत सरकारने, आॅक्टोबर २०१७ मध्ये ‘भारतमाला योजना टप्पा-१’ला मंजुरी दिली. या प्रकल्पात ३४,८०० कि. मी. रस्ते बांधले जाणार आहेत. त्यांचा अंदाजित खर्च ५,३५,००० कोटी रुपये आहे. यात ९ हजार कि.मी.चा आर्थिक कॉरिडॉर आहे. ६ हजार कि.मी. अंतर्गत कॉरिडॉर आणि फिडर रोड आहेत.
याशिवाय ५ हजार कि.मी. राष्ट्रीय कॉरिडॉर कार्यक्षमता सुधारणा, २ हजार कि.मी. सीमा व आंतरराष्ट्रीय जोडणी रस्ते, २ हजार कि.मी. किनारपट्टी व बंदर जोडणी रस्ते आणि ८०० कि.मी. एक्स्प्रेस वे यात आहेत.

Web Title: Everyone says 'work should stop', but nobody says 'start work;' Nitin Gadkari's displeasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.