शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक आंतरजातीय प्रेमविवाह हा लव्ह जिहाद नाही, प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते- न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 16:43 IST

प्रत्येक प्रेमविवाहाला लव्ह जिहाद असं संबोधू शकत नाही, असं केरळच्या उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयात कन्नूरच्या श्रुती व अनिस हमीद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.

कोची - प्रत्येक प्रेमविवाहाला लव्ह जिहाद असं संबोधू शकत नाही, असं केरळच्या उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयात कन्नूरच्या श्रुती व अनिस हमीद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. श्रुतीनं केरळच्या उच्च न्यायालयात स्वतःच्या पतीसोबत राहण्यासाठी परवानगी मागितली होती. न्यायालयानं श्रुतीला पती अनिसबरोबर राहण्यास परवानगी दिली. अनिसनं श्रुतीचं अपहरण केल्याचा त्याच्यावर आरोप होता. तसेच श्रुतीचं जोरजबरदस्तीनं धर्म परिवर्तन करून त्यानं श्रुतीसोबत जबरदस्तीनं निकाह केल्याचाही अनिसवर आरोप लावण्यात आला होता. त्यावेळी याविरोधात श्रुतीनंच न्यायालयात दाद मागितली. प्रत्येक प्रेमविवाह हा लव्ह जिहादचा प्रकार होऊ शकत नाही. आंतरजातीय विवाहांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा केरळमधलंच एक लव्ह जिहाद प्रकरण चर्चेत आलं होतं. या लव्ह जिहादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले आहे. हादिया आणि शफीन जहान यांचा विवाह केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत रद्द केला. या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात शफीन जहानने अखिला अशोकनबरोबर विवाह केला. अखिलाने इस्लाम धर्म स्वीकारून हादिया हे नाव धारण केल्यानंतर हा विवाह संपन्न झाला होता. या विवाहाविरोधात अखिलाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माझ्या मुलीला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले. तिला अफगाणिस्तान किंवा सीरियाला पाठवले जाऊ शकते, असा आरोप त्यांनी याचिकेत केला होता.या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ऑगस्ट महिन्यापासून एनआयएने तपास सुरू केला होता. सर्वोच्च न्यायालयाला एनआयएमार्फत तपास हवा असेल तर, आपली काही हरकत नाही असे केरळ सरकारने सांगितले होते.

टॅग्स :Courtन्यायालय