शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 05:25 IST

अजब राज्य : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देण्याची परंपरा यंदाही कायम राहणार?

सुहास शेलारजयपूर : गेल्या २५ वर्षांत राजस्थानच्या जनतेने सतत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला आहे. १९९३ मध्ये भैरोसिंह शेखावत, १९९८ मध्ये अशोक गेहेलोत, २००३ मध्ये वसुंधरा राजे, २००८ पुन्हा अशोक गेहेलोत आणि २०१३ साली पुन्हा वसुंधराराजे असा सत्ताबदल झाला. यंदा निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून सरकारविरोधी सूर दिसत आहे. त्यामुळे १८० जागा निवडून आणण्याचा दावा करणाºया मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासमोर पुन्हा सत्ता राखण्याचे आव्हान आहे.

अ‍ॅट्रॉसिटीचे सर्वाधिक गुन्हे नोंद होणाºया राज्यांत राजस्थानची गणना होते. ते कमी करण्यासाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या वसुंधरा राजे सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे दलित-आदिवासींमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड संतापाचे वातावरण आहे. गोमांस विक्री व सेवनाच्या मुद्द्यावरून राजस्थानात झुंडबळीच्या अनेक घटना घडल्या. त्या रोखण्याऐवजी मुख्यमंत्री वसुंधराराजे व त्यांच्या सरकारमधील काहींनी त्याचे अप्रत्यक्ष समर्थनच केले. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातही सरकारविषयी रोष आहे. परिणामी ही निवडणूक वसुंधरा राजे यांना कटकटीची ठरणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इतके मोठे राज्य काँग्रेसच्या हाती जाणे महागात पडू शकते, याचा अंदाज भाजपाला आहे. त्यामुळे अमित शहांनी आपली ‘फौज’ राजस्थानात उतरवली आहे. ती स्थानिक मतदारांचा आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचा कौल लक्षात घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणी करीत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचार कसा करावा? याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.

राजस्थानी जनतेचा सूर विद्यमान लोकप्रतिनिधींविरोधात आहे, हे शेतकरी, गुज्जर समाज, राजपूत व जाटांनी केलेल्या आंदोलनांतून दिसून आले आहे. त्यामुळे नवे चेहेरे देऊन मतदारांची नाराजी दूर करणे अणि पक्षात दीर्घकाळापासून काम करणाºया कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांचाही राग शांत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यासाठी आमदार-खासदारांच्या कामाचा फिडबॅक सातत्याने घेतला जात आहे. नमो अ‍ॅपद्वारेही माहिती गोळा केली जाते आहे. या अ‍ॅपवर मतदारांनी आपल्या आमदार-खासदारांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी मांडल्या आहेत. त्यामुळे विद्यमान १६३ आमदारांपैकी ८० ते ९० जणांचे तिकिट कापले जाण्याची शक्यता आहे.राजस्थानमधील सर्व २५ जागांवर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता. त्यावेळी मोदी लाट, काँग्रेसच्याविरोधी वातावरण वसुंधराराजे सरकारच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा प्रभाव मतदारांवर होता. मात्र, हवा पालटल्याचा प्रत्यय राजस्थानातील पोटनिवडणुकीतून आला. अजमेर व अलवर या लोकसभेच्या दोन आणि मांडलगड या विधानसभेच्या एका जागेवर भाजपाला पाणी सोडावे लागले. या जागा जिंकून काँग्रेसने ‘राजस्थानात पुढचे सरकार आमचेच’, असा नारा लगावला. या सगळ्या घडामोडी, तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक व नंतर लगेचच आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेत अमित शहा यांनी बुथ स्तरावर संघटना मजबूत करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.आणखी एका आमदाराचा राजीनामाराजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पहिल्या यादीतून वगळल्याने संतप्त झालेले आमदार हबिबूर रहमान यांनी मंगळवारी राजीनामा दिला. पाचवेळा भाजपचे आमदार व राज्यमंत्री असलेले सुरेंद्र गोयल यांनी उमेदवारी न मिळाल्याने सोमवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसºयाच दिवशी रहमान यांनीही बंडाचा झेंडा उभारला.डुंगरपूर येथील भाजप आमदार देवेंद्र कटरा यांचाही पत्ता कापण्यात आला असून ते आपल्या समर्थकांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतील. राजस्थान ७ डिसेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या २०० पैकी १३१ उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये विद्यमान ८७ आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले असून २६ जणांना मात्र वगळण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानElectionनिवडणूक