शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतून महुआ मोइत्रांचे निलंबन निश्चित? नैतिकता समितीकडून प्रस्ताव पास; अहवालही स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 17:48 IST

TMC MP Mahua Moitra News: नैतिकता समिती आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे.

TMC MP Mahua Moitra News: संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपात लोकसभेच्या नैतिकता समितीपुढे तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची चौकशी करण्यात होती. महुआ मोइत्रा यांनी लोकसभेत अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच आणि किंमती भेटवस्तू घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता.  यासंदर्भात नैतिकता समितीची एक महत्त्वाची बैठक झाली असून, त्यामध्ये यासंबंधी मसुदा अहवाल स्वीकारल्याचे वृत्त आहे. तसेच महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून निलंबित करावे, अशी शिफारस नैतिकता समितीने केल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार विनोदकुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील नैतिकता समितीची बैठक झाली. या बैठकीत अहवाल स्वीकारण्यात आला. अहवालाच्या बाजूने ६ तर विरोधात ४ जणांनी मतदान केले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी काँग्रेस खासदार परिणीत कौर यांनी अहवालाच्या समर्थनार्थ मतदान केले. नैतिकता समितीचा मसुदा अहवाल पक्षपाती आणि चुकीचा आहे, अशी टीका या विरोधात मतदान करणाऱ्या चार सदस्यांनी केली आहे. नैतिकता समिती सदर अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पाठवण्यात येणार आहे. 

महुआ मोइत्राचे लोकसभेतून निलंबन करा

महुआ मोइत्राचे लोकसभेतून निलंबन करा, अशी शिफारस समितीने केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.  महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांबाबत समितीने अहवाल तयार केला आहे. या अहवालावर बैठकीत चर्चा होऊन तो स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. समितीच्या सहा सदस्यांनी अहवाल स्वीकारण्याचे समर्थन केले तर चार सदस्यांनी विरोध केला. आता पुढील कारवाईसाठी हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष विनोदकुमार सोनकर यांनी माहिती दिली.

दरम्यान, मसुदा अहवालात मोईत्रा यांच्या वर्तनाचा निषेध करण्यात आल्याचे वृत्त आहे. या नैतिकता समितीमध्ये १५ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे सात, काँग्रेसचे तीन आणि बसपा, शिवसेना, वायएसआर काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) आणि जनता दल (युनायटेड) यांच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाMahua Moitraमहुआ मोईत्राTrinamool Congressतृणमूल काँग्रेस