शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रधान राेजगारदात्यांसाठी नवी इलेक्ट्रॉनिक सुविधा; ‘ईपीएफओ’ने ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 04:53 IST

कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवणे होणार सोपे

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संस्थेने (ईपीएफओ) प्रधान रोजगारदात्यांसाठी (प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स) विशेष इलेक्ट्रॉिनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेद्वारे आपल्या कंत्राटदारांकडून ईपीएफ नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवणे प्रधान रोजगारदात्यांना सोपे होणार आहे.ईपीएफओच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून नव्या सुविधेची माहिती देण्यात आली आहे. रोजगार देणाऱ्या संस्थेचा मालक, वापरकर्ता अथवा व्यवस्थापक यास प्रधान रोजगारदाता म्हटले जाते. या व्यक्तीकडे आस्थापना अथवा कंपनीचे नियंत्रण अपेक्षित आहे. कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगार ठेवण्याचे अधिकार प्रधान रोजगारदात्याकडे असतात. नियम पालन प्रभावी व्हावे, यासाठी प्रधान रोजगारदाता आणि श्रम कंत्राटदार यांना परस्परांशी जोडण्याचे काम नवी सुविधा करते. ही सुविधा ईपीएफओच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सूत्रांनी सांगितले की, या सुविधेवर कंपनी अथवा आस्थापनेचे कार्यादेश, बाह्य कार्य कंत्राट अथवा कंत्राटी कामगार यांची माहिती अपलोड केली जाऊ शकते. ई-गव्हर्नन्स व्यवस्था प्रभावीपणे राबवून भविष्य निर्वाह निधीचा लाभ  पात्र कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.नोंदणीसाठी दोन श्रेणी या नव्या इलेक्ट्रॉिनिक सुविधेवर दोन श्रेणीत नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या संस्था ईपीएफओशी आस्थापना कोड आणि मोबाईल क्रमांकाने नोंदणीकृत आहेत, त्यांच्यासाठी एक व्यवस्था असून पॅन व मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणीकृत असलेल्या सरकारी संस्था व विभागासाठी दुसरी व्यवस्था आहे. सूत्रांनी सांगितले की, या व्यवस्थेद्वारे ईपीएफओने प्रधान रोजगारदात्यांसाठी नियंत्रण व नियमन अधिक सुलभ  केले आहे. त्यामुळे अनुपालन अधिक सोपे होईल.