शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

आता तुमचा क्लेम वारंवार रिजेक्ट होणार नाही, EPFO ​​ने जारी केली नवी गाइडलाइन; नक्की वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:29 IST

EPFO New Guideline For Online Claim : जर तुम्ही घरबसल्या ईपीएफ क्लेमसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल आणि तुमचा क्लेम वारंवार नाकारला जात असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

EPFO New Guideline For Online Claim : जर तुम्ही घरबसल्या ईपीएफ क्लेमसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल आणि तुमचा क्लेम वारंवार नाकारला जात असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यासाठी EPFO ​​ने प्रादेशिक कार्यालयांना एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. जेणेकरून आता तुमचा क्लेम रिजेक्ट होणार नाही. ईपीएफओने प्रादेशिक कार्यालयांना एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे की ईपीएफसाठी केल्या जाणार्‍या ऑनलाइन दाव्यांवर लवकरात लवकर प्रक्रिया करावी. एकच क्लेम अनेक कारणांसाठी नाकारला जाऊ नये असंही नमूद करण्यात आलं आहे. 

ईपीएफओच्या या मार्गदर्शक तत्त्वानंतर क्लेम वारंवार रिजेक्ट होणार नाही अशी अपेक्षा आहे. प्रत्येक क्लेमची प्रथमतः सखोल चौकशी केली जावी आणि नाकारण्याचे कारण प्रथमच सदस्याला कळवण्यात यावे. अनेकदा तोच दावा वेगवेगळ्या कारणांनी फेटाळला जात असल्याचे तपासात आढळून आलं आहे, असं ईपीएफओनं म्हटलं आहे. 

क्षेत्रीय कार्यालयांनी देखील अशाच प्रकारचे पीएफ दावे नाकारल्याचा अहवाल परिमंडळ कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवणे आवश्यक आहे जेणेकरून अपेक्षित वेळेत प्रक्रिया केली जाईल. सदस्यांच्या तक्रारी काही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाळल्या जाणार्‍या अनियमित पद्धतींकडे निर्देश करतात. गैरप्रकारांमुळे सदस्यांना योग्य लाभ सेवा वितरीत करण्यात विलंब होतो ज्यामध्ये अनावश्यक कागदपत्रे मागवणे इत्यादी कारणांचा समावेश आहे. चुकीच्या प्रथा तातडीने बंद करण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत.

क्लेम रिजेक्ट होऊ नयेईपीएफओनं केलेल्या विभागीय चौकशीत असं निदर्शनास आलं की अनेक प्रकरणांमध्ये क्लेम एका विशिष्ट कारणास्तव वारंवार फेटाळले गेले आणि जेव्हा ते दुरुस्त केल्यानंतर पुन्हा सादर केले गेले, तेव्हा ते इतर/वेगळ्या कारणांमुळे पुन्हा नाकारले गेले. सर्व जबाबदार अधिकार्‍यांनी कोणताही दावा फेटाळला जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच कारण नसताना जाणूनबुजून दावा नाकारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं ईपीएफओनं म्हटलं आहे. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारी