शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

EPFO ची जबरदस्त सेवा सुरु; देशभरात कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात करता येणार क्लेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 10:51 IST

ईपीएफओने मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सेवा सुरु केली आहे. याआधी क्लेम करायचा असल्यास संबंधित रिजनल कार्यालयाला क्लेम फॉर्म पाठवावा लागत होता.

नवी दिल्ली : देशभरातील खासगी, सरकारी नोकरदारांना भविष्याची बेगमी करणारी सरकारी संस्था EPFO दिवसेंदिवस कमालीची अद्ययावत होत आहे. लॉकडाऊनमध्येच EPFO ने कात टाकली आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचा पीएफ आता कुठूनही काढता येणार आहे.

ईपीएफओने मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सेवा सुरु केली आहे. याआधी क्लेम करायचा असल्यास संबंधित रिजनल कार्यालयाला क्लेम फॉर्म पाठवावा लागत होता. यामुळे नोकरीचे ठिकाण, कंपनी, राज्य बदलल्यास कर्मचाऱ्यांना मोठी समस्या येत होती. एकतर बेभरवशी पोस्टल, कुरिअर सेवा किंवा स्वत:हून ईपीएफओ कार्यालयात जाऊन कामे करावी लागत होती. आता ही कटकट वाचणार आहे. 

कामगार मंत्रालयानुसार नवीन सुविधेमध्ये क्षेत्रिय कार्यालयांची व्यवस्था बदलण्यात आली आहे. आता यापुढे देशभरातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयामध्ये कोणत्याही अन्य क्षेत्रातील दावे सोडविले जाणार आहेत. 

या नव्या सुविधेनुसार भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, अंशत: पीएफ काढणे आणि अन्य दाव्यांचे निराकरण कोणत्याही कार्यालयातून केले जाणार आहे. तसेच ऑनलाईन दाव्यांवरही काम केले जाणार आहे. यामुळे दाव्यांना लागणारा वेळ कमी होणार आहे. यामुळे पीएफची नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना संकटामुळे कर्मचारी स्थलांतर किंवा अडकलेले आहेत. त्यांना ही समस्या जाणवत होती. यावर ईपीएफओने कायमचा तोडगा काढला आहे.

याचबरोबर कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबई, ठाणे, हरियाणा आणि चेन्नईमधील क्षेत्रिय कार्यालयांमध्ये दाव्याचा निपटारा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. तर ईपीएफओने सूट दिल्याने दाव्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे हे दावे मंजूर करण्यासाठी वेळ लागत आहे. आता लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत झालेले ईपीएफओ खातेधारक त्यांच्या जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये दावे करू शकणार आहेत. EPFOची देशभरात एकून 135 क्षेत्रीय कार्यालये आहेत. यामध्ये 65 लाख पेंशनर्स आहेत. कोरोना संकटात आव्हाने असताना अधिकाऱ्यांनी मे 2020 पर्यंत सर्वांना पेन्शन दिली आहे. याचबरोबर एप्रिल 2020 पासून 2,70,000 रकमेच्या 80 हजारहून अधिक दाव्यांचा दर दिवशी निपटारा करण्य़ात येतो. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण

भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार

जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या