Bihar Assembly Election 2020: बिहारच्या मतमोजणीकडे लागले संपूर्ण देशाचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 07:04 IST2020-11-09T00:46:55+5:302020-11-09T07:04:45+5:30
१० नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.

Bihar Assembly Election 2020: बिहारच्या मतमोजणीकडे लागले संपूर्ण देशाचे लक्ष
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजातून मिळाल्याने एनडीए, विशेषतः भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे आता मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.
नवनिर्वाचित आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप वा नितीश कुमार करतील, हे लक्षात घेऊन काँग्रेसने दोन वरिष्ठ नेत्यांना बिहारला पाठविले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सर्व जबाबदारी रणदीप सुरजेवाला व अविनाश पांडे यांनी पेलली . एक्झिट पोलनंतर दुसऱ्या दिवशी, रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार हे दोन्ही नेते पाटण्याला पोहोचले आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या प्रचार सभांना म्हणावी तितकी गर्दी नव्हती.
सत्तांतराची शक्यता
नितीशकुमार यांची सत्ता जाऊन ती सूत्रे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीकडे येतील असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत.