बंगळुरू - काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, कर्नाटकमधील घटनाक्रमाबाबत राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती आणि राज्य स्तरावर राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. बंगळुरू येथे काँग्रेसच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद यांनी सध्या सुरू असलेल्या घटनांबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की ' कर्नाटकमधील घटनाक्रमाबाबत राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती आणि राज्य स्तरावर राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशातील लोकशाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. ''
राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या भूमिकेबाबत देशात संताप, गुलाम नबी आझाद यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 22:54 IST