पुरेवाट...! बिहारमध्ये ट्रेनचे डिझेलच संपले; रात्रीची वेळ...; रेल्वे प्रशासनाची फजिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:35 IST2025-01-28T16:35:05+5:302025-01-28T16:35:21+5:30
दरभंगामध्ये रेल्वेच्या इंजिनाचेच डिझेल संपल्याने त्या रेल्वेतील प्रवाशांना चार तास हाल सहन करावे लागल्याची घटना समोर येत आहे.

पुरेवाट...! बिहारमध्ये ट्रेनचे डिझेलच संपले; रात्रीची वेळ...; रेल्वे प्रशासनाची फजिती
कधी कधी वाहनातील इंधन संपते, तेव्हा काय हालत होते याचा अनुभव काही लोकांनाच आला असेल. अनेकदा इंधन संपायला आले आणि आसपास पेट्रोल पंप सापडत नसेल तरी काय हालत होते याचा मात्र सर्वांनीच अनुभव घेतला असेल. आता तर इलेक्ट्रीक वाहन मालकांची तशी अवस्था असते. असाच वाचकांना हसून हसून लावेल आणि प्रवाशांचा हाल हाल करून पुरेवाट लावेल अशी घटना घडली आहे.
दरभंगामध्ये रेल्वेच्या इंजिनाचेच डिझेल संपल्याने त्या रेल्वेतील प्रवाशांना चार तास हाल सहन करावे लागल्याची घटना समोर येत आहे. सोमवारी रात्री दरभंगा ते फारबिसगंजला जाणाऱ्या ट्रेनबाबत हा प्रकार घडला आहे. या ट्रेनच्या डिझेल इंजिनचे डिझेलच संपले होते. यामुळे रेल्वे प्रशासनाची मोठी फजिती झाली.
अखेर स्टेशन मास्तरांनी स्थानिक स्तरावर एका पेट्रोल पंपाकडून डिझेलची व्यवस्था केली. तेव्हा कुठे ही ट्रेन पुढे जाऊ शकली. परंतू यासाठी चार-पाच तासांचा वेळ गेला. दरभंगा जंक्शनवर डीएमयू ट्रेनला डिझेल देण्यास टाळाटाळ करण्यात आली. याचा फटका बसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरभंगा जंक्शनवर डिझेल संपलेले होते. रेल्वे अधिकाऱ्यांशी अनेक प्रयत्न आणि चर्चेनंतर, स्टेशन मास्टरना स्थानिक पातळीवर डिझेलची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे येथील ट्रेनना डिझेल मिळू शकणार आहे.
ट्रेनच्या इंजिन ड्रायव्हरने सांगितले की ट्रेनमध्ये डिझेल नव्हते, त्यामुळे ट्रेन बराच वेळ थांबली होती. आता दरभंगा स्टेशन मास्तरांनी डिझेलची व्यवस्था केली आहे. डिझेल भरल्यानंतर ट्रेन रवाना होईल, असे एका प्रवाशाने स्थानिक मीडियाला सांगितले होते.