इंग्लंडच्या पंतप्रधानांनी नेसली साडी, का ते जाणून घ्या ?

By Admin | Updated: November 8, 2016 19:54 IST2016-11-08T19:54:21+5:302016-11-08T19:54:21+5:30

भारताच्या दौ-यावर असताना टेरेसा मे यांनी चक्क साडी परिधान करून बंगळुरूतल्या ऐतिहासिक श्री सोमेश्वरा स्वामी मंदिरात भेट देऊन देवाचं दर्शन घेतलं आहे.

English Prime Minister, Nesli Saadi, Why Know It? | इंग्लंडच्या पंतप्रधानांनी नेसली साडी, का ते जाणून घ्या ?

इंग्लंडच्या पंतप्रधानांनी नेसली साडी, का ते जाणून घ्या ?

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - इंग्लंडच्या पंतप्रधानपदी हल्लीच विराजमान झालेल्या टेरेसा मे सध्या भारताच्या दौ-यावर आहेत. भारताच्या दौ-यावर असताना टेरेसा मे यांनी चक्क साडी परिधान करून बंगळुरूतल्या ऐतिहासिक श्री सोमेश्वरा स्वामी मंदिरात भेट देऊन देवाचं दर्शन घेतलं आहे.

साडी परिधान केलेल्या टेरेसा मे सोशल मीडियावर खूपच चर्चेत आल्या आहेत. या साडीत टेरेसा फारच सुंदर दिसत असून, अनेकांना त्यांचा हा फोटो आकर्षित करतो आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारतात येऊन साडी परिधान करून मंदिरात देवाचं दर्शन घेण्याचा पहिलाच प्रकार आहे.



एका दशकानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंग्लंडचा दौरा करणारे पहिले पंतप्रधान ठरले होते. अलीकडेच इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची पत्नी समंथा कॅमेरून यांनी साडी परिधान करून 2015मध्ये वेम्बले स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना भेट दिली होती.

भारत आणि इंग्लंडदरम्यान यावेळी दोन महत्त्वाचे करार झाले आहेत. टेरेसा मे आज इंग्लंडला रवाना होणार आहेत.

Web Title: English Prime Minister, Nesli Saadi, Why Know It?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.