इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 07:04 IST2024-10-29T07:04:14+5:302024-10-29T07:04:31+5:30
जामीन अर्जावरील सुनावणी स्थानिक न्यायालयाने स्थगित केली.

इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील खासदार अब्दुल रशीद ऊर्फ इंजिनीअर रशीद यांनी जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी स्थानिक न्यायालयाने स्थगित केली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदरजीत सिंग यांनी सांगितले की, रशीद हे आता खासदार असल्यामुळे त्यांच्या विराेधातील प्रकरणावर सुनावणी करणे या न्यायालयाच्या अधिकार कक्षेत आहे की नाही, यावर विचार करण्यात येईल. हे प्रकरण लाेकप्रतिनिधींशी संबंधित विशेष न्यायालयात स्थानांतरित करावे की नाही, यावर विचार करण्यात येईल.
एनआयएचे विशेष खासदार/आमदार न्यायालय यावर सुनावणी घेणार का, हे ठरल्यानंतरच जामीनावर निर्णय घेण्यात येईल. १३ नाेव्हेंबरला अधिकार क्षेत्राबाबत आढावा घेण्यात येईल, त्यानंतर त्यावर १९ नाेव्हेंबरला निर्णय देण्यात येईल. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी रशीद यांना २०१९ मध्ये अटक झाली हाेती.