ए. राजा, कनिमोळीच्या सुटकेविरोधात ईडी दिल्ली हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 06:29 PM2018-03-19T18:29:04+5:302018-03-19T18:29:04+5:30

माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या सुटकेविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Enforcement Directorate files appeal against acquittal of A Raja | ए. राजा, कनिमोळीच्या सुटकेविरोधात ईडी दिल्ली हायकोर्टात

ए. राजा, कनिमोळीच्या सुटकेविरोधात ईडी दिल्ली हायकोर्टात

Next

नवी दिल्ली- माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या सुटकेविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये या दोघांची सुटका विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी सूटका केली होती. राजा, कनिमोळी यांच्यासह १९ जणांवर दाखल केलेल्या तक्रारीनुसार तपास करण्यात ईडीला अपयश आल्याचे त्यावेळेस कारण देण्यात आले होते. 

राजा, कनिमोळी यांच्याबरोबर माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा, राजाचे खासगी सचिव आर. के. चंडोलिया, स्वॅन टेलिकॉमचे प्रवर्तक शाहिद उस्मान बलवा आणि विनोद गोएंका, युनायटेड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा आणि गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा, हरी नायर यांचीही न्यायालयाने सूटका केली होती.



 

Web Title: Enforcement Directorate files appeal against acquittal of A Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.