पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:10 AM2019-02-27T05:10:21+5:302019-02-27T05:10:53+5:30

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांचे रक्त संतापाने उसळत असतानाच, भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांनी मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला आणि दहशतवाद्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानात, त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि त्यांचे २५ कमांडर ठार झाले. तब्बल ४८ वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

The end of the terrorists entering Pakistan | पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खात्मा

पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खात्मा

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मतभेद बाजूला ठेवून हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे, भारतीय हवाई दलाचे या कारवाईत अजिबात नुकसान झाले नाही आणि जवानांना खरचटलेही नाही. या हल्ल्याचे वृत्त येताच देशभर तिरंगा फडकावून, मिठाई वाटून आणि ‘जयहिंद’च्या घोषणा देत आनंद साजरा करण्यात आला. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनीही या हल्ल्याचे स्वागत केले. देशात आज उत्सवाचेच वातावरण होते, तर पाकिस्तानात मातम पसरला होता. हवाई दलाच्या या कारवाईची तयारी गेले १२ दिवस सुरू होती, पण ती माहिती अतिशय गुप्त ठेवण्यात आली.


हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले २१ मिनिटे सुरू होते. या हल्ल्याने बालाकोटचा सारा परिसर हादरून गेला. तिन्ही दहशतवादी तळ जंगलांमध्ये होते. आसपासच्या गावांतील लोक घाबरून बाहेर आले. त्यांनी स्फोटांचे प्रचंड आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत भारतीय हवाई दलाने आपली मोहीम फत्ते करून विमाने परतलीही होती.
तब्बल ४८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.


पंतप्रधान मोदी होते वॉर रूममध्ये
ही कारवाई सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील वॉर रूममधून त्यावर लक्ष ठेवून होेते. सकाळी त्यांनी मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, अधिकारी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी या कारवाईबाबत चर्चा केली, तसेच याचे परिणाम व बाळगायची दक्षता, यावरही विचारविमर्श केला. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली,


‘जैश’च्या बालाकोटवर नेमके काय होते?
जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर जलतरण तलाव होता. तोही नष्ट करण्यात आला आहे. दहशतवादी प्रशिक्षणासाठीच त्याचा वापर केला जात असे.
येथे २६ प्रकारे दहशतवादी हल्ले करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात समुद्री अतिरेकी कारवायांचाही समावेश आहे. समुद्रमार्गे एखाद्या देशात वा भागात घुसून दहशतवादी कारवाई कशी करायची, हे समजण्यासाठी या जलतरण तलावात त्यांना शिकविले जात असे.
यापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील कसाब व अन्य दहशतवादी समुद्रमार्गेच आले होते. त्यांनाही याच प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले असावे, हे बालाकोट केंद्रातील जलतरण तलावामुळे स्पष्ट झाले.
दहशतवादी टार्गेट, पाकला घडविली अद्दल
अशा कारवाईला नॉन मिलिटरी आॅपरेशन (लष्करेतर कारवाई) म्हटले जाते. या कारवाईत पाकिस्तान या देशाला नव्हे, तर तिथे असलेल्या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले होते. ही कारवाई म्हणजे पाकिस्तानशी युद्ध नव्हते. मात्र, दहशतवाद्यांना आश्रय व अर्थसाह्य देणाऱ्या पाकिस्तान सरकार, लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर संघटना यांनाही या हल्ल्याने अद्दल घडली आहे.


११ दिवस तयारी सुरू
होती पूर्वतयारीपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व गृहमंत्री राजनाथ सिंह बैठकीला हजर होते. पाकिस्तानातल्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ नष्ट करण्याच्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख बिरेंदरसिंग धनोआ यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदिल दिला. त्याबाबत ११ दिवसांच्या पूर्वतयारीनंतर भारताने पाकिस्तानला मंगळवारी जोरदार हादरा दिला. पुलवामा हल्ल्यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद
झाले होते. हा हल्ला घडविणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवा, अशी प्रत्येक भारतीयाची मागणी होती. त्यानुसार पावले टाकण्यात आली.

Web Title: The end of the terrorists entering Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.