पितापुत्राची एकाच वेळी अंत्ययात्रा

By Admin | Updated: June 23, 2016 21:31 IST2016-06-23T21:31:46+5:302016-06-23T21:31:46+5:30

नशिराबाद : येथे पित्यापाठोपाठ पुत्राचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. पिता पुत्राची एकाच वेळी अंत्ययात्रा पाहण्याचा दुर्दैवी प्रसंगही ग्रामस्थांनी अनुभवला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

The end of the father's son at the end | पितापुत्राची एकाच वेळी अंत्ययात्रा

पितापुत्राची एकाच वेळी अंत्ययात्रा

िराबाद : येथे पित्यापाठोपाठ पुत्राचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. पिता पुत्राची एकाच वेळी अंत्ययात्रा पाहण्याचा दुर्दैवी प्रसंगही ग्रामस्थांनी अनुभवला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
सतीबाजार चौकातील किराणा दुकानदार दत्तात्रेय गणपत सदाफळे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन झाले. ही बातमी त्यांचे पुत्र दिलीप सदाफळे (वय ५४) यांना मिळाली. त्यात कुठल्याशा कारणामुळे दिलीप यांचेही सकाळी ९.३० वाजता निधन झाले. त्यामुळे सदाफळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोघा पिता पुत्राची अंत्ययात्रा एकाच वेळी गावातून निघाली. दत्तात्रेय सदाफळे यांच्यामागे श्रीकृष्ण, गणेश व जयंत ही मुले तर दिलीप सदाफळे यांच्या मागे सचिन, सागर ही मुले आहेत.

Web Title: The end of the father's son at the end