परदेशपुरा भागात अतिक्रमणाचा विळखा

By Admin | Updated: May 8, 2014 16:00 IST2014-05-08T16:00:57+5:302014-05-08T16:00:57+5:30

येवला : परदेशपुरा भागात अतिक्रमणे हटवून स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा येवला पालिकेसमोर २५ मेपासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Encroachment breaks in foreign countries | परदेशपुरा भागात अतिक्रमणाचा विळखा

परदेशपुरा भागात अतिक्रमणाचा विळखा

वला : परदेशपुरा भागात अतिक्रमणे हटवून स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा येवला पालिकेसमोर २५ मेपासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या परिसरात गटारीवर अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे गटारी स्वच्छ होत नाही. परिणामी दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढते आहे. क्रॉसपाईप नसल्याने गटार तुडुंब भरली की रस्त्यावर पाणी वाहते. अनेक वेळा तक्रार करूनही पालिका दखल घेत नाही यामुळे परिसरातील मंदा परदेशी यांच्यासह सहकार्‍यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
पालिका प्रशासनाने, उपोषणाचे इशार्‍यावर एक पत्र दिले आहे. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी क्रॉस पाइप टाकून गटार दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र दिले आहे व उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Encroachment breaks in foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.