शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, AK-47 सह अनेक शस्त्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:53 IST

Encounter with Naxals : सुरक्षा दलांनी नक्षलवादाविरोधात आपली मोहिम तीव्र केली आहे.

Encounter with Naxals :छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी(दि.22) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये  भीषण चकमक झाली. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. तर, भेज्जी भागात अजूनही चकमक सुरुच आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, आतापर्यंत ठार झालेल्या 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून AK-47, एसएलआर आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, गुरुवारी नक्षलवादी ओडिशातून छत्तीसगडमध्ये घुसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले. 

भेज्जी परिसर जंगलांनी वेढलेला अधिकाऱ्याने सांगितले की, भेज्जी परिसरात डीआरजी आणि सीआरपीएफ टीमसोबत नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ज्या भागात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होत आहे तो परिसर जंगलाने वेढलेला आहे. जवळच पर्वत आहेत. कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम आणि भांडारपदर गावांजवळील जंगलात ही चकमक सुरू आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सुरक्षा दलांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, आमचे सरकार नक्षलवादाबद्दल झिरो टॉलरन्स धोरणावर काम करत आहे. बस्तरमधील विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा खात्मा निश्चित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात आहोत.

यापूर्वी 5 नक्षलवादी ठार पाच दिवसांपूर्वी, रविवारी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून इंसास, एक एसएलआर आणि 12 बोअर रायफलसह मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. याशिवाय, रविवारीच छत्तीसगडमधील बलरामपूरमध्ये जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. शोध मोहिमेदरम्यान सैनिकांनी रस्त्याच्या कडेला सुमारे 4 किलो वजनाचा आयडी टिफिन बॉम्ब निकामी केला.

नारायणपूरमध्ये 32 नक्षलवादी ठारयापूर्वी ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 32 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर नक्षलवादी कारवायांची माहिती जवानांना मिळाली होती. या इनपुटवर जवानांनी ऑपरेशन सुरू केले आणि 32 नक्षलवाद्यांना ठार केले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीAmit Shahअमित शाह