छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:05 IST2025-06-08T07:04:42+5:302025-06-08T07:05:27+5:30

Naxal commander 'Bhaskar' killed: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ५ जूनपासून चकमक सुरू आहे. येथे तीन दिवसांत ७ नक्षलवाद्यांचा  खात्मा करण्यात आला.  

Encounter on Chhattisgarh border: Naxal commander 'Bhaskar' killed, 7 Naxalites killed in 3 days | छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

गडचिरोली -  छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ५ जूनपासून चकमक सुरू आहे. येथे तीन दिवसांत ७ नक्षलवाद्यांचा  खात्मा करण्यात आला.

पहिल्या दिवशी तीन कोटींचे बक्षीस असलेला केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम (६९) याचा खात्मा केला. दुसऱ्या दिवशी तेलंगणा राज्य समिती सदस्य व नक्षल कमांडर भास्कर ऊर्फ मैलारापू अडेल्लूसह (४५) दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान घातले.

अत्याधुनिक शस्त्रे जप्त
शनिवारी, ७ जूनला तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. भास्करच्या डोक्यावर ४५ लाखांचे बक्षीस होते. चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले.
नक्षलवाद्यांची ओळख, रेकॉर्डची पुष्टी करण्यासाठी फॉरेन्सिक आणि गुप्तचर पथके घटनास्थळी पोहोचली.

अमित शाह यांच्याकडून अधिकाऱ्यांचे कौतुक
नवी दिल्ली : नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. शाह यांनी ‘एक्स’वर  जवानांचे  अभिनंदन केले आहे.

Web Title: Encounter on Chhattisgarh border: Naxal commander 'Bhaskar' killed, 7 Naxalites killed in 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.