शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 14:53 IST

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानं मंगळवारी सकाळी (26 डिसेंबर) दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम फत्ते केली.

श्रीनगर -  जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानं मंगळवारी सकाळी (26 डिसेंबर) दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम फत्ते केली. दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. यानंतर जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.  या चकमकीदरम्यान, जवानांनी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या एका टॉपच्या कमांडरचा खात्मा केला. 

पुलवामा परिसरात दोन दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर तातडीनं परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. संपूर्ण परिसरात भारतीय लष्करातील जवानांनी एसओजी व सीआरपीएफसोबत मिळून शोध मोहीम सुरू केली. ज्या घरात दहशतवादी लपले त्या परिसराला जवानांनी घेराव घातला.  चारही बाजूंनी घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका द दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. नूर मोहम्मद असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा टॉपचा कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून 'ऑपरेशन ऑल आउट' सुरू करण्यात आले असून या अंतर्गत 203 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या 3 वर्षांतील ही आकडेवारी सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे.  यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 2017मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 10 डिसेंबरपर्यंत 203 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे तर 2016 मध्ये 148 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता व 2015 मध्ये 108 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.  

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर