कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:08 IST2023-10-26T15:07:56+5:302023-10-26T15:08:14+5:30
'कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मच्छल सेक्टरमध्ये चकमक सुरू झाली आहे, यामध्ये आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत.

कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरूच
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछाल सेक्टरमध्ये गुरुवारी लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली, यामध्ये सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे. 'कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मच्छल सेक्टरमध्ये चकमक सुरू झाली आहे, यामध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अजुनही ऑपरेशन चालू आहे.
तुम्हीही QR कोड स्कॅन करुन पेमेंट करता? होऊ शकते मोठी फसवणूक; नेमकं प्रकरण काय?
यापूर्वी, लष्कराच्या श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले होते की, “घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे,” आणि ऑपरेशन चालू आहे.
यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. यादरम्यान, पोलिसांनी सांगितले होते की, परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर शोपियानच्या अलिशपोरामध्ये चकमक सुरू झाली.