कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सर्व बाजूंनी ५ दहशतवाद्यांना घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 20:02 IST2025-03-23T19:49:51+5:302025-03-23T20:02:33+5:30

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे रविवारी (२३ मार्च) संध्याकाळी उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आहे.

Encounter between security forces and terrorists in Kathua, 5 terrorists surrounded from all sides | कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सर्व बाजूंनी ५ दहशतवाद्यांना घेरले

कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सर्व बाजूंनी ५ दहशतवाद्यांना घेरले

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे रविवारी (२३ मार्च) संध्याकाळी उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आहे.

अखेर नागपूर ‘कर्फ्यू’मुक्त, सहा दिवसांनी बाजारपेठा सुरू, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

कठुआमधील हिरा नगरमधील सान्यालमध्ये पाच दहशतवादी दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांची माहिती स्थानिकांनी सैन्याला दिली. पाच दहशतवादी लपल्याची माहिती दिली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सैनिकांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले.

सुरक्षा दलांनी सान्याल गावाजवळ शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांची संयुक्त टीम दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचताच त्यांनी गोळीबार सुरू केला. या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. अधूनमधून गोळीबार सुरूच आहे.

Web Title: Encounter between security forces and terrorists in Kathua, 5 terrorists surrounded from all sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.