काश्मीरमधल्या बारामुल्लात सुरक्षा दले अन् अतिरेक्यांमध्ये चकमक, लष्कराचा एक अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 09:12 IST2020-09-04T09:12:06+5:302020-09-04T09:12:17+5:30
सध्या सुरक्षा दलाने अतिरेक्यांना घेराव घातला आहे आणि गोळीबार सुरूच आहे.

काश्मीरमधल्या बारामुल्लात सुरक्षा दले अन् अतिरेक्यांमध्ये चकमक, लष्कराचा एक अधिकारी जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली आहे. चकमकीत लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला आहे. जखमी अधिका-याला सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सुरक्षा दलाने अतिरेक्यांना घेराव घातला आहे आणि गोळीबार सुरूच आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पाटणच्या यादीपोरा भागात अतिरेकी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर 29 आरआर आणि लष्कराच्या सीआरपीएफने परिसराला वेढा घातला.
दहशतवाद्यांनी स्वत: ला घेरलेले पाहिल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये गोळीबार सुरू होता.