शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

Teacher Job Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये हजारो जागांवर शिक्षक भरती; पहा राज्यात जागा किती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 13:06 IST

EMRS Teacher Recruitment 2021, Government Job in Maharashtra: मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, PGT टीचर आणि TGT टीचर पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल म्हणजेच आजपासून खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा. 

Sarkari Naukri, EMRS Teacher Recruitment 2021: आदिवासी कार्य मंत्रालयाने 17 राज्यांमध्ये 3479 पदांवर शिक्षक भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकलव्य मॉडेल निवासी स्कूल (EMRS) मध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, PGT टीचर आणि TGT टीचर पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल म्हणजेच आजपासून खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा.  (Eklavya Model Residential School Recruitment 2021: Online Application For 3479 TGT, PGT, Principal & Vice Principal Posts; Check Details)

भरती परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (NTA) करणार असून tribal.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 

EMRS Teacher Notification 2021 : महत्वाच्या तारखा...ऑनलाइन अर्ज सुरुवात: 1 एप्रिल 2021ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2021 अर्ज शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल 2021 परीक्षा : जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे. याची नेमकी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. 

EMRS Teacher Recruitment 2021 Vacancy Details: पदांचे विवरण: प्रिंसिपल - 175 पदेव्हाईस प्रिंसिपल - 116 पदेपोस्ट ग्रॅजुएट टीचर- 1244 पदेट्रेंड ग्रॅजुएट टीचर - 1944 पदे एकूण - 3479

या भरतीनुसार महाराष्ट्रात एकूण 216 जागा भरायच्या आहेत. 

शिक्षणाची अट....प्रिंसिपल, व्हाईस प्रिंसिपल आणि पोस्ट ग्रॅजुएट टीचर पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीतकमी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याची पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी असणे गरजेचे आहे. सोबत बीएड किंवा समकक्ष पात्रतेची पदवी व कॉम्प्युटरचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. प्रिंसिपल, व्हाईस प्रिंसिपल पदासाठी अनुभवींना प्राधान्य दिले जाणार आहे. तर पोस्ट ग्रॅजुएट टीचरसाठी उमेदवाराला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये प्राविण्य लागणार आहे. याशिवाय टीजीटी पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतल्याचे प्रमाणपत्र, ५० टक्के अट. तसेच बीएड किंवा समकक्ष पदवी असायला हवी. अन्य माहितीसाठी खाली नोटिफिकेशन लिंक देण्यात आली आहे. 

निवड...आदिवासी कार्य मंत्रालय भरती 2021 साठी उमेदवारांची निवड ही कॉम्प्युटरवर आधारीत परिक्षेद्वारे केली जाणार आहे. यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे. 

अधिकृत नोटिफिकेशनसाठी इथे क्लिक करा...अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :Teacherशिक्षकgovernment jobs updateसरकारी नोकरीjobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र