शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

एक लाख तरुणांना राेजगार; एप्रिलपर्यंत मिळणार थेट नोकऱ्या, वरिष्ठ पदांवर महिलांना मिळणार मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:27 IST

टीमलीज डिजिटल या संस्थेच्या एका अहवालातून गेमिंग क्षेत्रातील राेजगाराच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात गेमिंग उद्याेगात २० ते ३० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज आहे. 

नवी दिल्ली : ई-काॅमर्स, ऑनलाईन शाॅपिंगशिवाय आणखी एक क्षेत्र आहे जिथे माेठ्या प्रमाणावर लहान मुले, तरुण-तरुणी आकर्षित हाेतात. ते आहे गेमिंगचे. ऑनलाईन असाे किंवा ऑफलाईन, गेमिंग ॲपचे अनेकांना वेड असते. भारतात या क्षेत्राचा झपाट्याने विस्तार हाेत असून पुढील काही वर्षांमध्ये त्यातून माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्मिती हाेणार आहे. टीमलीज डिजिटल या संस्थेच्या एका अहवालातून गेमिंग क्षेत्रातील राेजगाराच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात गेमिंग उद्याेगात २० ते ३० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे १ लाख नवे राेजगार निर्माण हाेऊ शकतात, हे विशेष. या क्षेत्रात महिलांचा ४० टक्के वाटा आहे. भविष्यात अनेक वरिष्ठ पदांवर महिला दिसू शकतात.

या क्षेत्रात संधी वाढणार -प्राेग्रामिंग : गेम डेव्हलपर्स, युनिटी डेव्हलपर्सटेस्टिंग : गेम टेस्टिंग इंजिनिअरिंग, गुणवत्ता, क्यूए लीडॲनिमेशन डिझाईन : माेशन ग्राफिक डिझायनर, व्हर्च्युअल रिॲलिटी डिझायनर्सकलाकार : व्हीएफएक्स, काॅन्सेप्ट आर्टिस्टइतर राेल्स  : कंटेट लेखक, गेमिंग पत्रकार, रचनाकार

२०२६ पर्यंत २.५ लाख नव्या राेजगारनिर्मितीअपेक्षा

५०  हजार सध्या लाेकांना गेमिंग उद्याेगातून राेजगार मिळत आहे. 

३०%  त्यात प्राेग्रामर आणि डेव्हलपर्स आहेत.

भारत दुसरी सर्वात माेठी बाजारपेठ -- २०२६ पर्यंत गेमिंग उद्याेग ३८ हजार काेटी रुपयांपर्यंत वाढू शकताे.- देशात सध्या सुमारे ४८ काेटी गेमर्स आहेत.- गेमिंग उद्याेगाची जागतिक बाजारपेठ सुमारे १७.२५ लाख काेटी रुपयांची आहे.- चीनमध्ये सर्वात माेठी बाजारपेठ आहे.- उत्पन्नाच्या बाबतीत भारत जगातील सहावी माेठी बाजारपेठ आहे.- चालू आर्थिक वर्षात ७८० काेटींची परकीय गुंतवणूक या क्षेत्रात शक्य

तीन पटीने वाढणार गेमिंग उद्याेग- भारतातील गेमिंग उद्याेग २०२७ पर्यंत ३.३ पटीने वाढून सुमारे ८.६ अब्ज डाॅलर्स एवढा हाेऊ शकताे.- विद्यमान विकास दर २७ टक्के आहे

२०२१-२२ मध्ये ५०.७ गेमर्स हाेते. त्यात १२ काेटी गेमर्स गेमसाठी पैसे माेजतात. 

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीStudentविद्यार्थी