नवीन तंत्रज्ञान वापरताना कर्मचार्‍यांनी सतर्क राहावे एमआयडीसी: सुरक्षा सप्ताह साजरा

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:23+5:302015-03-06T23:07:23+5:30

अहमदनगर: औद्योगिक क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू झाली असून, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे़ नवीन तंत्रज्ञान हाताळताना कामगारांनी सतर्क राहावे, असे आवाहन लार्सन ॲण्ड टुब्रो कंपनीने येथील सह सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी बुधवारी येथे केले़

Employees should be alert when using new technology MIDC: Celebrate Security Week | नवीन तंत्रज्ञान वापरताना कर्मचार्‍यांनी सतर्क राहावे एमआयडीसी: सुरक्षा सप्ताह साजरा

नवीन तंत्रज्ञान वापरताना कर्मचार्‍यांनी सतर्क राहावे एमआयडीसी: सुरक्षा सप्ताह साजरा

मदनगर: औद्योगिक क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू झाली असून, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे़ नवीन तंत्रज्ञान हाताळताना कामगारांनी सतर्क राहावे, असे आवाहन लार्सन ॲण्ड टुब्रो कंपनीने येथील सह सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी बुधवारी येथे केले़
नागापूर औद्योगिक वसाहतीत आयोजित ४४ व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ सह सरव्यवस्थापक संदीप महाजन, सुरक्षाप्रमुख रघुनाथ कुताळ, संतोश माणकेश्वर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष किरण देशमुख आदी यावेळी उपस्थित होते़ यंदा कंपनीच्या सर्व सहयोगी भागीदारांना सुरक्षा सप्ताहात समाविष्ट करण्यात आले आहे़ त्यामुळे छोट्या-छोट्या उद्योजकांमध्येही सुरक्षितेविषयी जागृतता निर्माण होईल़ छोट्या चुकांमुळे अपघात होण्याची शक्यता असते़ छोट्या चुकांकडे बारकाईने पाहून तातडीने त्यात सुधारणा केल्यास अपघात टळतील़सुरक्षा ही सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता कामगारांनी सुरक्षा आत्मसात करावी, असे पारगावकर यावेळी म्हणाले़ सुरक्षा सप्ताहानिमित्त ४ ते ११ मार्चपर्यंत कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने विविध स्पर्धार्ंचे आयोजन करण्यात आले आहे़ सुरक्षितेविषयीची उपकरणे, निबंध स्पर्धा, गृहसुरक्षितता, प्रथम उपचाराचे महत्व, व्यसन व आरोग्य, घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर या स्पर्धेत मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले़

Web Title: Employees should be alert when using new technology MIDC: Celebrate Security Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.