कर्मचार्यांनो, प्रशिक्षणाची संधी गमावू नका - विजयकुमार फड
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
नांदेड : नगरपालिका अधिकारी-कर्मचार्यांनी योजनाविषयक बाबींचे अद्ययावत प्रशिक्षण घेतल्यास गतिमान व पारदर्शक प्रशासनाला संबंधित योजना योग्यप्रकारे राबविण्यास व लाभार्थ्यांचा विकास होण्यास चालना मिळेल, त्यामुळे कर्मचार्यांनी प्रशिक्षणाच्या संधी दडवू नयेत, असे प्रतिपादन नगरपालिका प्रशासन उपायुक्त डॉ़विजयकुमार फड यांनी केले़
कर्मचार्यांनो, प्रशिक्षणाची संधी गमावू नका - विजयकुमार फड
नांदेड : नगरपालिका अधिकारी-कर्मचार्यांनी योजनाविषयक बाबींचे अद्ययावत प्रशिक्षण घेतल्यास गतिमान व पारदर्शक प्रशासनाला संबंधित योजना योग्यप्रकारे राबविण्यास व लाभार्थ्यांचा विकास होण्यास चालना मिळेल, त्यामुळे कर्मचार्यांनी प्रशिक्षणाच्या संधी दडवू नयेत, असे प्रतिपादन नगरपालिका प्रशासन उपायुक्त डॉ़विजयकुमार फड यांनी केले़जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ातील १४ पालिकांचे अधिकारी व कर्मचार्यांच्या कामकाजाचा आढावा तसेच मूलभूत कामकाजविषयक बाबींवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ दैनंदिन कामकाजात अनेक अधिकारी कर्मचार्यांना त्यांच्याशी संबंधित कामाव्यतिरिक्त इतर बाबी, नियमांचे ज्ञान घेण्याचे संधी कमी मिळते़ मात्र कार्यशाळा कार्यक्रमात हे ज्ञान सविस्तर मिळत असल्याने कर्मचार्यांचा आत्मविश्वास व विषयाचे ज्ञान वाढण्यास मदत मिळत असते़ अर्धवट ज्ञान किंवा अज्ञान विविध बाबींना अडचणीचे ठरतात़ त्यामुळे कर्मचार्यांना संबंधित विषयाचे ज्ञान आवश्यक आहे़ ही गरज कार्यशाळेच्या माध्यमातून पूर्ण होते़ त्यामुळे कर्मचार्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे असेही फड म्हणाले़ शेतीच्या रस्त्यासाठी तहसीलसमोर आमरण उपोषणमुदखेड : येथील शेतकर्यांनी त्यांच्या शेतीच्या रस्त्यासाठी २५ मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले़ जगदीश सोनी, संजय चंदे्रे, विनोद चंद्रे उपोषणाला बसले आहेत़न्याहाळी शेतशिवारातील गट क्ऱ६३, ६५, ६७, ६८, ६९, ७०, ७१ मधील शेती उत्पादन घरी किंवा बाजारात नेण्यासाठी प्रशासनाने रस्ता उपलब्ध करून दिला नाही़ या संदर्भात संबंधित शेतकरी २०१० पासून पाठपुरावा करीत आहेत़ निदान नोंदीप्रमाणे पाऊलवाट तरी योग्य रुंदीची करून द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे़दरम्यान तहसीलदार लक्ष्मण सोनवणे यांनी आपल्या कक्षात तालुका भूमि अभिलेख अधिकारी, मंडळ अधिकारी रेड्डी, तलाठी साले यांची बैठक घेवून स्थळ पाहणी केली़ उपोषणकर्त्यांशी शिवसेनेचे अविनाश झमकडे, उमेश शर्मा, महावीर उन्हाळे, वैजनाथ पचलिंग आदींनी भेट घेतली़