कर्मचारी बदल्यांना सापडला मुहूर्त

By Admin | Updated: May 5, 2014 20:16 IST2014-05-05T20:16:05+5:302014-05-05T20:16:05+5:30

१६ ते २३ मे जिल्हास्तर, २६ ते ३१ मे तालुकास्तर

Employee transfers found | कर्मचारी बदल्यांना सापडला मुहूर्त

कर्मचारी बदल्यांना सापडला मुहूर्त

ते २३ मे जिल्हास्तर, २६ ते ३१ मे तालुकास्तर
नाशिक : लोकसभेची आचारसंहिता १६ मे रोजी संपूर्णपणे संपुष्टात येत असतानाच जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना मुहूर्तही १६ ते ३१ मे दरम्यान लागणार आहे. शासन स्तरावरून कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासंदर्भात ई-मेल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, त्यात बदल्यांचे वेळापत्रक देण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी याबाबत तातडीची खातेप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना कर्मचार्‍यांच्या बदल्यांसंदर्भात आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुडके यांचा ई-मेल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत मार्गदर्शक तत्त्वे विहित केली आहेत. जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया प्रत्यक्ष समुपदेशनाने पार पाडण्याबाबत ५ ते १५ मे व तालुकास्तरीय बदल्यांची प्रक्रिया प्रत्यक्ष समुपदेशनाने पार पाडण्याबाबत १६ ते २५ असा कालावधी विहित केला आहे. जिल्हास्तरीय बदल्यांच्या प्रक्रियेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी लागू असलेली आचारसंहिता व त्याकरिता नेमणूक केलेला कर्मचारी वर्ग या बाबी विचारात घेता, बदल्यांची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सदर बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये फक्त या वर्षासाठी खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. त्यात जिल्हास्तरीय बदल्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, त्यानुसार जिल्हास्तरीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी प्रत्यक्ष बदलीप्रक्रिया समुपदेशनाने पार पाडणे १७ ते २३ मे व तालुकास्तरीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी २६ ते ३१ मे या कालावधीत प्रत्यक्ष बदलीप्रक्रिया समुपदेशनाने पार पाडण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
इन्फो..
शिफारशींचा ढीग
जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रक प्राप्त होताच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या शिफारशींच्या पत्रांचा ढीग लागल्याचे कळते. मात्र बदल्या नियमानुसारच होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Employee transfers found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.