कोरोनाच्या भीतीमुळे कर्मचाऱ्याची आत्महत्या; कार्यालयात घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 06:28 IST2020-04-04T02:20:29+5:302020-04-04T06:28:42+5:30
कोरोना साथीमुळे २१ दिवस लागू केलेल्या टाळेबंदीचे उल्लंघन करण्याचे प्रकार काही थांबण्यास तयार नाहीत.

कोरोनाच्या भीतीमुळे कर्मचाऱ्याची आत्महत्या; कार्यालयात घेतला गळफास
सहारनपूर: आधीपासून नैराश्यावस्थेत असलेल्या एका सरकारी कर्मचाºयाने कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे स्वत:च्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली. या सरकारी कर्मचाºयाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, कोरोनाची लागण होईल, अशी भीती मला सतत वाटत होती. या गोष्टीला त्याच्या नातेवाईकांनीही दुजोरा दिला आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेशकुमार यांनी पत्रकारांना दिली.
याआधी छत्तीसगढमध्ये घरातच एकांतवासात ठेवलेल्या कोरोनाच्या एका संशयित रुग्णाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. ही व्यक्ती (३५ वर्षे) तमिळनाडूहून छत्तीसगढला परतली होती. कोरोना आजारसदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने त्याला एकांतवासात ठेवण्यात आले होते. तो छत्तीसगढमधील धमतरीजवळील तागापानी गावचा रहिवासी होता.
कोरोना साथीमुळे २१ दिवस लागू केलेल्या टाळेबंदीचे उल्लंघन करण्याचे प्रकार काही थांबण्यास तयार नाहीत. परस्परांपासून विशिष्ट अंतर दूर राहून सारे व्यवहार केल्यास तसेच घरातच थांबून राहिल्यास कोरोनाच्या संसर्गाला रोखता येईल, अशा सरकारकडून देण्यात येणाºया सूचना न पाळता लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. या सगळ्या प्रकारांमुळे पोलीस व सरकारी यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.