इचलकरंजीत खड्डयांचे साम्राज्य; पॅचवर्कचे काम निकृष्ट दर्जाचे पावसाळ्याआधी खड्डे बुजविण्याची मागणी
By Admin | Updated: May 12, 2014 21:09 IST2014-05-12T21:09:19+5:302014-05-12T21:09:19+5:30
(फोटो)

इचलकरंजीत खड्डयांचे साम्राज्य; पॅचवर्कचे काम निकृष्ट दर्जाचे पावसाळ्याआधी खड्डे बुजविण्याची मागणी
(फ ोटो)इचलकरंजी : शहरातील प्रमुख मार्गांवरील रस्त्यांच्या पॅचवर्कचे काम या वर्षभरात दोनवेळा करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पुन्हा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत.या वर्षभरामध्ये नगरपालिकेने दोनवेळा मुख्य मार्गावर पॅचवर्क केले. पहिल्यांदा झालेले पॅचवर्कचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या दोन महिन्यांतच निघून रस्त्यावर खडी पसरली. त्यावरून घसरून पडून दोघांचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेवर मोर्चे काढण्यात आले. नागरिकांनी नगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. त्यानंतर काही दिवसांनी तरतूद करून पालिकेने दुसर्यांदा पॅचवर्कचे काम केले. सहा महिने उलटल्यानंतर सद्य:स्थितीला पुन्हा पॅचवर्क केलेल्या जागेवर, तर काही ठिकाणी त्याच्या बाजूला नवीन खड्डे तयार झाल्याचे दिसत आहे.आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महिन्यातच हे खड्डे बुजवणे गरजेचे आहे; अन्यथा पावसाळ्यात पाणी साचून रस्ते खराब होण्याबरोबरच मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. शहरातील शाहू पुतळा, डेक्कन रोड, कापड मार्केट, थोरात चौक, आर.पी. रोड, महेश सेवा समिती, विकली मार्केट, झेंडा चौक, गावभाग, लिंबू चौक यासह अनेक प्रमुख चौक व रस्ते यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पॅचवर्कनंतर काही ठिकाणी रिलायन्स केबल खुदाईमुळे पुन्हा रस्ते खराब झाले आहेत. नगरपालिकेने खुदाईने झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटीची रक्कम संबंधित कंपनीकडून भरून घेतली असली, तरी त्याचेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यांच्या बाजूला चर तशीच राहिली आहे. पावसाळ्यात त्याठिकाणी वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवून घ्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)चौकटतीन बत्ती ते कलानगर रस्ता पॅचवर्कचे काम अर्धवटतीन बत्ती ते कलानगर-चंदूर ओढा या मार्गावरील दोनवेळा केलेले निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क निघून गेले. आता तिसर्यांदा या मार्गावरील पॅचवर्कचे काम झाले आहे. मात्र, ते अर्धवट स्वरूपाचे करण्यात आले आहे. काही ठिकाणी खड्डे तसेच सोडण्यात आले आहेत, तर अर्धा रस्ता हॉटमिक्स, तर अर्धा रस्ता मोकळाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हॉटमिक्स झालेल्या रस्त्यावरून जाण्याच्या नादात वाहनधारकांत छोटे-मोठे अपघात व वादावादी होताना दिसत आहे. पालिकेत संबंधित मक्तेदाराला रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतरच त्याची बिले काढावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.(फोटो ओळी)१२०५२०१४-आयसीएच-०२इचलकरंजीतील थोरात चौकामधील रस्त्यावर असे खड्डे पडले आहेत.१२०५२०१४-आयसीएच-०३महेश सेवा समिती समोर सुरू असलेले निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कचे काम.१२०५२०१४-आयसीएच-०४तीन बत्ती ते कलानगर रस्त्यावर अर्ध्या भागात हॉटमिक्स, तर अर्ध्या भागात खड्डे तसेच सोडल्याचे छायाचित्र.(सर्व छाया-उत्तम पाटील)