शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

संरक्षण दलाची यंत्रसामग्री भारतातच बनवण्यावर भर', पण FDIची मर्यादा नेली 74 टक्क्यांवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:57 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, एकूण 8 क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली. यापैकी एक, संरक्षण दलाला आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी मेक इन इंडियावर भर देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, एकूण 8 क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली.संरक्षण दलाच्या यंत्रसामग्रीसाठी मेक इन इंडियावर भर.FDIची मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्यात आली असल्याचेही सीतारमण यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ला : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. बरेच उद्योग धंदे सध्या ठप्प आहेत. यामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भारत सरकारने 'आत्मनिर्भर भारत'ची घोषणा देत, 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. याच पॅकेजचा चौथा हप्ता आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केला. गेल्या बुधवारपासूनच निर्मला सीतारमण या, 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देत आहेत. त्या रोज कुठल्या ना कुठल्या सेक्टरसंदर्भात महत्वाच्या आणि काही विशेष घोषणा करत आहेत. 

आणखी वाचा - CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना बरे झाल्यानंतरही सोडत नाही पिच्छा; चीनमधील डॉक्टरांनी दिला 'गंभीर' इशारा

संरक्षण दलाच्या यंत्रसामग्रीसाठी मेक इन इंडियावर भर - निर्मला सीतारमण यांनी आज, संरक्षण दलाला आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी मेक इन इंडियावर भर देण्यात येईल, असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, संरक्षण दलासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आवश्यक असतात. सरकार काही शस्त्र, वस्तू, स्पेयर्सची यादी तयार करेल. त्यांची आयात बंद केली जाईल आणि भारतातच त्यांची निर्मिती केली जाईल. याशिवाय आयुध निर्मिती कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन होईल. ते खासगी मालकीचे असणार नाहीत. तसेच FDIची मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्यात आली असल्याचेही सीतारमण यांनी यावेळी सांगितले. 

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

8 क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा -अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, एकूण 8 क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली. यात, कोळसा, मिनरल, संरक्षण विषयक उत्पादने, सिव्हिल एव्हिएशन, पावर डिस्ट्रिब्यूशन, सोशल इन्फ्रा प्रोजेक्ट्स, स्पेस आणि अॅटॉमिक एनर्जी यांचा समावेश आहे. तसेच, खासगी क्षेत्रांतील गुतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठीही काही बदल केले जातील. आता 30 टक्के केंद्र तर 30 टक्के राज्य सरकार वायबिलिटी गॅप फंडिंगच्या स्वरुपात देईल. इतर क्षेत्रांसाठी हे 20 टक्केच असेल, असेही सीतारमण यांनी सांगितले.

आणखी वाचा - आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतDefenceसंरक्षण विभाग