प्रवाशाला हृदयविकाराचा झटका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

लखनौ : विमानातील एका प्रवाशास अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने भुवनेश्वरवरून दिल्लीकडे निघालेले इंडिगोचे विमान आपातस्थितीत लखनौ विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र याउपरही प्रवाशाचे प्राण वाचू शकले नाहीत.

Emergency landing of the flywheel heart attack | प्रवाशाला हृदयविकाराचा झटका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

प्रवाशाला हृदयविकाराचा झटका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

नौ : विमानातील एका प्रवाशास अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने भुवनेश्वरवरून दिल्लीकडे निघालेले इंडिगोचे विमान आपातस्थितीत लखनौ विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र याउपरही प्रवाशाचे प्राण वाचू शकले नाहीत.
विमानतळाचे संचालक एस.सी. होता यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. इंडिगोचे एक विमान रविवारी भुवनेश्वरवरून दिल्लीकडे निघाले होते. यादरम्यान यातील प्रवासी शिवकुमार पाणिग्रही यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यामुळे रात्री ८ वाजून १७ मिनिटाला विमान आपातस्थितीत लखनौ विमानतळावर उतरविण्यात आले. विमान उतरताच पाणिग्रही यांना प्राथमिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. तथापि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Emergency landing of the flywheel heart attack