इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; मंत्र्यांसह 180 प्रवासी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 11:06 IST2019-09-30T10:58:12+5:302019-09-30T11:06:02+5:30
बिघाड वेळेत समजल्यामुळे मोठी दुर्घटना टळली

इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; मंत्र्यांसह 180 प्रवासी थोडक्यात बचावले
नवी दिल्ली : दिल्लीला येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे तांत्रिक बिघाडामुळे रविवारी रात्री उशिरा गोव्यात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या विमानात एका मंत्र्यासह अधिकारी आणि 180 प्रवासी होते.
विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे गोव्यातील डाबोलिम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानात गोव्याचे पर्यावरण मंत्री निलेश काब्राल, कृषी संचालक आणि अधिकारी प्रवास करत होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते.
IndiGo flight from Goa to Delhi (6e-336) returned to Goa airport after 15 minutes of being airborne yesterday, after the flight detected a glitch in the engine. pic.twitter.com/f3ntnJiCt4
— ANI (@ANI) September 30, 2019
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीला रवाना होण्यासाठी विमानाचे उड्डाण झाल्यानंतर 15 मिनिटांनी समजले की, विमानात बिघाड झाला आहे. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दरम्यान, इंडिगो एअरलायन्सकडून अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वेळेत समजल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.