शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

२५ जून 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळला जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 17:41 IST

Constitution Assassination Day: संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धक्का देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी खेळी केली असून, आणीबाणीची घोषणा झालेला २५ जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान हा प्रचाराचा मोठा मुद्दा बनला होता. तसेच ४०० जागा आल्यास मोदी आणि भाजपा संविधान बदलतील, या विरोधकांनी केलेल्या प्रचारामुळे भाजपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन शपथ घेतली होती. त्यानंतर विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून सरकारने आणीबाणीचा निषेध करणारा प्रस्ताव लोकसभेत आणला होता. आता संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धक्का देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी खेळी केली असून, आणीबाणीची घोषणा झालेला २५ जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

आता दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिवस पाळला जाईल, असे अमित शाह यांनी याबाबतची घोषणा करताना सांगितले. याबाबत घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, २५ जून रोजी १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या हुकूमशाही प्रवृत्तीचं दर्शन घडवताना भारतीय लोकशाहीचा गळा आवळला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकण्यात आलं होतं. तसेच प्रसारमाध्यमांचाही आवाज दाबण्यात आला होता. आता भारत सरकारवने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्यय घेतला आहे. या दिवशी १९७५ च्या आणीबाणीच्या काळात ज्या लोकांनी यातना भोगल्या, त्याचं स्मरण केलं जाईल.

 

अमित शाह यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला त्या लोकांचा सन्मान करायचा आहे ज्यांनी हुकूमशाह सरकारकडून देण्यात आलेल्या असंख्य यातनांचा सामना करून लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी संघर्ष केला. संविधान हत्या दिवस हा काँग्रेससारख्या कुठल्याही हुकूमशाही मानसिकतेला भविष्यात याची पुनरावृत्ती करता येऊ नये म्हणून, प्रत्येक भारतीयाच्या मनात लोकशाहीचं रक्षण आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अमर ज्योतीला जिवंत ठेवण्याचं काम करेल, असेही अमित शाह यांनी सांगितले.   

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस