शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरात निघण्याआधी फरार झालेला नवरदेव प्रेयसीसोबत परतला, लहान भावाने केलं होणाऱ्या वहिनीसोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 09:53 IST

वरात निघण्याच्या काही तासांआधी खोटं बोलू फरार झाल्यावर समाज आणि नातेवाईकांसमोर नामुष्की झाली होती. जर लहान मुलगाही लग्नासाठी तयार झाला नसता तर दोन्ही परिवारांसाठी स्थिती गंभीर झाली असती.

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) लग्नाच्या दिवशी फेशिअल करायला जात असल्याचं कारण देत फरार झालेला नवरदेव 10 दिवसांनंतर आपल्या प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज करून घरी परतला. पण कुटुंबियांनी त्याला घरात येऊ दिलं नाही. त्याचे वडील म्हणाले की, आता त्यांचा त्यांच्या मुलासोबत काही संबंध नाही. तो वयस्क आणि त्याला जिथे ज्याच्यासोबत रहायचं आहे राहू शकतो. वरात निघण्याच्या काही तासांआधी खोटं बोलू फरार झाल्यावर समाज आणि नातेवाईकांसमोर नामुष्की झाली होती. जर लहान मुलगाही लग्नासाठी तयार झाला नसता तर दोन्ही परिवारांसाठी स्थिती गंभीर झाली असती.

मोहम्मदपूर गावात राहणारे मावत तिवारी यांनी आपला मोठा मुलगा शशांकचं लग्न बरेलीमध्ये ठरवलं होतं. 1 जानेवारीला वरात जाणार होती. वरात निघायच्या ठीक आधी फेशिअल आणि केस कापयला जात असल्याचं कारण देत तो पळून गेला होता. बराच वेळ जेव्हा शशांक परत आला नाही तेव्हा सगळेच घाबरले होते. त्याला खूप शोधण्यात आलं पण त्याचा काही पत्ता लागला नाही.

नंतर नवरीकडील लोकांसोबत बोलून शशांकचा लहान भाऊ विषर्भला नवरदेव बनवून वरात नेण्यात आली. आपल्या होणाऱ्या वहिनीसोबत विषर्भने सात फेरे घेऊन लग्न केलं. यादरम्यान परिवार आणि पोलीस शशांकला सगळीकडे शोधत होते. शशांकला शोधण्यासाठी पोलिसांनी सर्विलांसची मदत घेतली.

तेच याबाबत पोलीस अधिकारी अचल कुमार यांनी सांगितलं की, बेपत्ता नवरदेवाच्या नंबरच्या सीडीआरमध्ये एका तरूणीचा नंबर सापडला. नंतर त्या तरूणीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. तिची चौकशी केली तेव्हा तिने आधी काहीच सांगितलं नाही.

जेव्हा कठोरपणे विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, तिने शशांकसोबत कोर्टात लग्न केलं. नंतर तिने लग्नाचं प्रमाणपत्रही दाखवलं. यानंतर शशंकच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. शशांकडे वडील म्हणाले की, त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलासोबत नातं तोडलं आहे. ते वयस्क आहेत त्यांच्या मनाने कुठेही राहू शकतात.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके