रस्त्यावर फुटबॉल खेळणारा हत्ती

By Admin | Updated: May 26, 2017 01:05 IST2017-05-26T01:05:44+5:302017-05-26T01:05:44+5:30

हत्तीला रस्त्यावर खेळताना तुम्ही कधी पाहिले आहे का? सध्या या हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

Elephant playing football on the road | रस्त्यावर फुटबॉल खेळणारा हत्ती

रस्त्यावर फुटबॉल खेळणारा हत्ती

नवी दिल्ली : हत्तीला रस्त्यावर खेळताना तुम्ही कधी पाहिले आहे का? सध्या या हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हा हत्ती आसाममधील रस्त्यावर फुटबॉल खेळताना दिसतोय. हा हत्ती सर्वसामान्य माणसांप्रमाणे एका काठीने मजेत फुटबॉल खेळतोय. जणू तो फार कसलेला खेळाडू आहे.या खेळाडू हत्तीचा फुटबॉल बघण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. जवळपास अर्धा तास वाहतूक पुढे सरकली नाही.या हत्तीचा हा खेळ बघणारे अशोक गोगोई यांनी त्याचा व्हिडिओ बनवला व सोशल मीडियावर टाकला. सध्या या व्हिडिओची काही वाहिन्यांवर धूम सुरू आहे. ५० हजार लोकांनी तो बघितला आहे. स्टेडियम नसूनही तो एवढे चांगले खेळतो जसा काही फुटबॉलचा चॅम्पियनच आहे.

Web Title: Elephant playing football on the road