शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात बनणार वीज अन् सीमेपार बसणार झटका! पाकिस्तानला पाण्यासाठी वणवण करायला लावणार 'हे' प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:15 IST

India Pakistan Tension : सिंधु पाणी करार स्थगित केल्यानंतर भारत सरकारने धरणे आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकारने सिंधु करार स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात आधीच चिंतेचे वातावरण असताना आता शेजारी देशाला आणखी अडचणीत आणण्यासाठी भारताने पुढची पावले उचलली आहेत. सिंधु पाणी करार स्थगित केल्यानंतर भारत सरकारने धरणे आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या संबंधित मंत्रालये आणि इतर विभागांमध्ये बैठक झाली असून, त्यांना जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नियोजित जलविद्युत प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय असे अनेक नवे प्रकल्प सुरू करण्यावर जोर दिला जाणार आहे. सध्या यावर चर्चा सुरू असून, लवकरच त्या दिशेने पावले उचलली जाणार आहेत.

यासोबतच कोणते प्रकल्प लवकरात लवकर सुरू करता येतील याचा अहवाल सरकारने मागितला आहे. यादरम्यान,अशा १० नव्या प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असून, त्यावर सखोल अभ्यास केला जात आहे. यातील ५ प्रकल्पांना आधीच मंजूरी मिळाली आहे. तर, दोन प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर काढले जाणार आहेत. झेलम नदीवर बनलेल्या उरी-१ या प्रकल्पाचा आणखी विस्तार केला जाणार आहे. यामुळे किशनगंगा नदीतून येणाऱ्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर केला जाईल. यासाठी पुढच्या आठवड्यात निविदा निघू शकतात. दोन महिन्यांपूर्वी पर्यावरण विभागाकडून मंजूरी मिळाल्यानंतर आता या प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू झाले आहे.

'या' प्रकल्पांच्या कामांना मिळणार गती!असे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत, ज्यावर जलद गतीने काम करण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पांमध्ये सिंध नाल्यावरील न्यू गांदरबल प्रकल्प, चिनाब नदीवरील किरतई २, रामबन आणि उधमपूरमधील दोन प्रकल्प देखील सामील आहेत. या सगळ्या प्रकल्पांमध्ये मिळून ३१०० मेगावॅट वीज तयार केली जाऊ शकते. परंतु, या सगळ्या कामांसाठी राज्य आणि केंद्र स्तरावर अनेक परवानग्या येणं बाकी आहे. मात्र, सध्या सरकारची या कामांप्रती गती पाहता, लवकरच कामे सुरू केली जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जम्मू-काश्मीर मधील प्रकल्पांना लवकरात लवकर मंजूरी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, यातील काही प्रकल्प अतिशय धोकादायक आणि दुर्गम भागात आहेत. याशिवाय सुरक्षेचा प्रश्न देखील आहे. परंतु, हे अडथळे कसे दूर करता येतील यावर देखील बैठक पार पडली आहे.     

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला