पेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता बसणार वीज दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:27 AM2018-05-26T01:27:16+5:302018-05-26T01:27:16+5:30

कोळशाची कमतरता; ट्रान्समिशन लाइनही पडली बंद

Electricity haul shock now available to customers after petrol and diesel | पेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता बसणार वीज दरवाढीचा शॉक

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता बसणार वीज दरवाढीचा शॉक

Next

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने देश होरपळून निघाला असताना आता विजेच्या दरवाढीचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी जास्त असताना, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरेसा पुरवठा नाही. पश्चिम भारतातून उत्तरेकडील राज्यांना वीज पुरवणारी महत्त्वाची ट्रान्समिशन लाइन नेमकी या काळात तुटल्यामुळे वीजपुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे वीज दरात अनपेक्षित वाढ अपेक्षित आहे.
इंडियन एनर्जी एक्सचेंजमध्ये विजेची किंमत २ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ६ रुपये २0 पैसे प्रति युनिट नोंदली गेली. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये सोमवारी विजेचा दर ८ रुपयांवर पोहोचला, जो आधी ७ रुपये ४३ पैसे युनिट होता. एक्सचेंजमध्ये एका आठवड्यात वीजदरात युनिटमागे २ रुपये वाढ झाली.
गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश व तामिळनाडूत वीज टंचाई दूर करण्यासाठी वीज वितरण कंपन्या थेट स्पॉट मार्केटमधून वीज खरेदी करतात. या कंपन्यांना महाग दराने वीज मिळाल्यास तो बोजा त्या ग्राहकांवर टाकतात. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना वेळेवर पुरेसा कोळसा पुरवठ्यावरील देखरेखीचे काम केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडे आहे.
आजमितीला देशातील ११४ पैकी २२ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांत कोळशाचा साठा चिंताजनक आहे. १६ थर्मल प्लँटमधे अवघा ४ दिवस पुरेल इतका तर ६ थर्मल प्लँटमधे ७ दिवसांपुरता कोळसा शिल्लक आहे. कोळसा टंचाईला सामोऱ्या जाणाºया वीजनिर्मिती केंद्रांपैकी ९ उत्तर भारतात तर १३ पश्चिम भारतात आहेत.

संकटात भर
पश्चिम भारताकडून उत्तर भारताला वीजपुरवठा करणारी ट्रान्समिशन लाइन नेमकी याच काळात तुटली. अगोदरच संकटात असलेल्या वीजपुरवठ्यात त्यामुळे अधिकच भर पडली. त्यामुळे यंदाच्या पेट्रोल, डिझेलबरोबर वीज दरवाढीचा झटकाही ग्राहकांना सोसावाच लागेल.

सध्या १६ थर्मल प्लँटमध्ये अवघा ४ दिवस पुरेल इतका तर ६ थर्मल प्लँटमधे ७ दिवसांपुरता कोळसा शिल्लक आहे.

Web Title: Electricity haul shock now available to customers after petrol and diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.