"चुनावी भाषण...!" प्रियांका, अखिलेश ते शशी थरूर यांच्यापर्यंत...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर विरोधक भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 21:20 IST2025-02-04T21:19:14+5:302025-02-04T21:20:03+5:30
"हे निवडणूक भाषण होते. उद्या दिल्लीत लोक मतदान करणार आहेत. याचा विचार करत ते बोलत होते. शहरी नक्षलवादासंदर्भात बोलणेही योग्य नव्हते."

"चुनावी भाषण...!" प्रियांका, अखिलेश ते शशी थरूर यांच्यापर्यंत...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर विरोधक भडकले
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांवर थेट प्रहार केले. त्यांच्या भाषणानंतर आता विरोधकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. यासंदरभात काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी अपनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला वाटते, पंतप्रधान मोदी जनतेपासून आणि जनतेच्या गरजांपासून दूर गेले आहेत. आजच्या भाषणातून मला हेच जाणवले," असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "याचा आमच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. आपण घराणेशाहीच्या मुद्द्यावर वारंवार बोलला आहात. आपण राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलायला हवे होते. विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्यायला हवे होते. भाषण कसे द्यावे, हे पंतप्रधानांना माहित आहे. हे निवडणूक भाषण होते. उद्या दिल्लीत लोक मतदान करणार आहेत. याचा विचार करत ते बोलत होते. शहरी नक्षलवादासंदर्भात बोलणेही योग्य नव्हते."
सरकार आकडे लपवत आहे : अखिलेश यादव -
ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, कुंभ मेळ्यात एवढी मोठी घटना घडली, हा केवळ विरोधकांचाच प्रश्न नाही, तर संपूर्ण जगाने ते बघितले आहे. सरकार बेपत्ता आणि मृत लोकांचा आकडा लपवत आहे. आम्ही 2 मिनिटांचे मौन पाळण्याचे आवाहन केले होते. पण आज कोणीही त्याची पर्वा केली नाही. सरकारला जीविताच्या आणि मालमत्तेच्या नुकसानाची काहीही चिंता नाही.
लोकसभेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणावर काँग्रेस खासदार राजीव शुक्ला म्हणाले, "सोनिया गांधींवरील आरोप खोटे आहेत. प्रियंका गांधींनीही हे स्पष्ट केले आहे की, त्या राष्ट्रपतींचा आदर करतात आणि त्या असे काहीही म्हणाल्या नाहीत. खोटे पसरवले जात आहे आणि दुर्दैवाने पंतप्रधान मोदीही संसदेत त्याचा पुनरुच्चार करत आहेत. प्रत्येक वेळी गांधी कुटुंबाबद्दल अपशब्द बोलणे, हे भाषण आहे का?"