शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

निवडणूक रणधुमाळीत प्राप्तिकराचे छापे; कमलनाथ यांचे 'खास' ITच्या जाळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 5:49 AM

कमलनाथ निकटवर्तीयांवर भल्या पहाटे कारवाई. इंदोर, भोपाळ, गोवा, दिल्लीत एकाचवेळी छापे

नवी दिल्ली / भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधितांच्या दिल्ली, गोवा आणि मध्यप्रदेशातील ५२ ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने रविवारी भल्या पहाटे निवडणुकीच्या धामधुमीत धाडी टाकल्याने खळबळ उडाली. कमलनाथ यांचे माजी विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) प्रवीण कक्कड, माजी सल्लागार राजेंद्र मिगलानी आणि त्यांच्या मेहुण्याशी संबंधित कंपनी मोजर बेयरचे ज्येष्ठ अधिकारी आणि त्यांचे भाचे रातुल पुरी यांच्या कंपनीवर या धाडी टाकण्यात आल्या.

प्राप्तिकर विभागाच्या जवळपास २०० अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी पहाटे ३ वाजता धाडी टाकण्यास सुरुवात केली. या अधिकाऱ्यांनी इंदोर, भोपाळ, गोवा आणि दिल्ली (ग्रीन पार्क) मध्ये धाडी टाकल्या. निवडणुकीच्या काळात चालणारे संशयित हवाला व्यवहार आणि कर चोरी याच्याशी संबंधित या धाडी आहेत. या धाडींमध्ये १० ते १४ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. दिल्ली आणि अन्य राज्यांत मतदारांना लाच देण्यासाठी या रकमेचा उपयोग केला जाणार होता, अशी शक्यता आहे. तथापि, या धाडींची प्राथमिक माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड, आयटी विभागाची संबंधित शाखा आणि निवडणूक आयोग यांना देण्यात आली आहे. जप्तभूरिया यांचे ओएसडी होते.भुरिया हे सध्या मध्यप्रदेशातील रतलाम झाबुआ मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. कक्कड यांचे कुटुंबीय अनेक व्यवसायांशी संबंधित आहे. तर, रतुल पुरी यांची गेल्या आठवड्यात ईडीने अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात चौकशी केली होती. (वृत्तसंस्था)

राज्याला ठेवले अंधारातकेंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १५० जवानांची एक कंपनी शनिवारी दिल्लीहून मध्यप्रदेशकडे रवाना झाली. याबाबत राज्य गुप्तचर संस्थेने केंद्राकडून माहिती मागवली असता सीआरपीएफचे जवान निवडणुकीच्या कामासाठी व इतरही काही मदत कामासाठी मध्यप्रदेशात जात असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात ते धाडीच्या कामावर तैनातीसाठी जात होते. इतर कामांमध्ये नेमके कोणते काम याचा उल्लेख न करता केंद्राने मध्यप्रदेशला अशा प्रकारे अंधारात ठेवले.
सीआरपीएफ-पोलीस यांच्यात संघर्षभोपाळ येथे व्यावसायिक अश्विन शर्मा यांच्या ठिकाणांवर धाडी टाकण्याच्या वेळी घरात जाण्यावरून रविवारी सायंकाळी सीआरपीएफ व मध्यप्रदेश पोलिसांत संघर्ष उडाला. पोलिसांना बाजूला ठेवून सीआरपीएफच्या संरक्षणात ही कारवाई प्राप्तिकर विभागाने पार पाडली. धाडींच्या वेळी मध्यप्रदेश पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी कॉम्प्लेक्समध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता सीआरपीएफ जवानांनी त्यांना रोखले.
काँग्रेस म्हणते, हा राजकीय सूडहा तर राजकीय सूड आहे, अशा शब्दांत काँग्रेसने यावर टीका केली आहे. काँग्रेसचे मीडिया विभागाचे उपाध्यक्ष भूपेंद्र गुप्ता यांनी आरोप केला की, भाजप सरकार व्देषातून देशभरात विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे. यामुळे आंध्र चंद्राबाबू नायडू आणि द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी केंद्राविरुद्ध आंदोलन केले होते.

भाजप म्हणते, ही चोरांची तक्रारभाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेसचा हल्ला परतवून लावताना टिष्ट्वट केले आहेकी, कमलनाथ यांच्या निकटवर्तीयाच्या घरी धाडीत कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यातून एक बाब स्पष्ट होते की,जो चोर आहे, त्यालाच चौकीदाराबाबत तक्रार आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसIncome Taxइन्कम टॅक्स