म्हाडात दिवसभर निवडणुकीची रणधुमाळी

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:10+5:302015-08-28T23:37:10+5:30

म्हाडात दिवसभर निवडणुकीची रणधुमाळी

Election schedule for the entire day in MHADA | म्हाडात दिवसभर निवडणुकीची रणधुमाळी

म्हाडात दिवसभर निवडणुकीची रणधुमाळी

हाडात दिवसभर निवडणुकीची रणधुमाळी
मैत्री पॅनेलला बहुमत : सहयोग पॅनलला धक्का
मुंबई :
महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड एम्प्लॉईज को.ऑपरेटिव्हक्रेडिट सोसायटीसाठी शुक्रवारी मतदान झाले. उत्स्फुर्तपणे झालेल्या या निवडणुकीत मैत्री पॅनलला बहुमत मिळाले असून सहयोग पॅनलला या निवडणुकीत धक्का बसला आहे.
सोसायटीच्या कार्यकारिणीची पंचवार्षिक निवडणुकीत म्हाडा कर्मचार्‍यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सकाळी १0 वाजेपासून म्हाडा मुख्यालयात मतदानाला सुरुवात झाली. सोसायटीच्या सभासदांनी यामध्ये हिरीरिने सहभाग घेतला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत म्हाडा कर्मचारी मतदानासाठी येत होते. त्यामुळे म्हाडा कार्यालयात गर्दी झाली होती. ९५0 मतदारांपैकी ८२१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मैत्री आणि सहयोग पॅनलमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती. सहयोग पॅनल, मैत्री पॅनल यांनी प्रत्येकी ११ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामुळे म्हाडा कार्यालयातील प्रत्येकाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरु झाली. रात्री जाहीर झालेल्या निकालात मैत्री पॅनलने १0 जागांवर विजय मिळवला. तर सहयोग पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. सहयोग पॅनलचे मधुकर विचारे विजयी ठरले. तर इतर उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

Web Title: Election schedule for the entire day in MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.