शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

Election Result 2023: 'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 18:22 IST

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढविल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला, असे आघाडीतील मित्रपक्षांनी म्हटले आहे.

यातच, तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बनर्जी यांनी सोमवारी भाजपच्या विजयासंदर्भात प्रतिक्रिया देताना, "काँग्रेसने इंडिया अलायन्समधील इतर सदस्यांवर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासंदर्भात विश्वास ठेवला नाही. ज्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर हा काँग्रेसचा पराभव आहे, ना की  जनतेचा, असेही ममता यांनी म्हटले आहे.

"काँग्रेसने तेलंगणामध्ये विजय मिळवला. त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातही विजय मिळाला असता. काही मते इंडिया अलायन्समधील पक्षांमुळे कमी झाली. आम्ही जागावाटपाचा सल्ला दिला होता, हे खरे आहे," असेही ममता म्हणाल्या. 

'2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही' -ममता म्हणाल्या, "विचारधारेबरोबरच आपल्याला एका रणनीतीचीही आवश्यकता आहे. अशात जर जागावाटपावर एकमत झाले, तर भाजप 2024 मध्ये सत्तेवर येणार नाही. इंडिया अलायन्स पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी एकत्रीत काम करेल आणि चुका सुधारेल."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा