महाराष्ट्रातून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जेपी नड्डाही राज्यसभा खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 06:12 PM2024-02-20T18:12:19+5:302024-02-20T18:13:22+5:30

महाराष्ट्रातून भाजपचे 3 तर शिवसेना, NCP, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड...

Election of 6 people from Maharashtra to Rajya Sabha unopposed before polling; Sonia Gandhi from rajasthan and jp Nadda from gujrath also became Rajya Sabha MP | महाराष्ट्रातून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जेपी नड्डाही राज्यसभा खासदार

महाराष्ट्रातून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जेपी नड्डाही राज्यसभा खासदार

महाराष्ट्रातील 6 जणांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. आज अर्थात मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत या 6 जागांवर नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र या कालावधीत ना कुठले नवे नामांकन आले ना कुणी आपले नाव मागे घेतले. यामुळे 6 खासदारांची नावे राज्यसभेसाठी बिनविरोध पक्की झाली आहेत. यात भारतीय जनता पक्षाच्यात तीन, तर शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक-एक नेत्याचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून या नेत्यांची झाली बिनविरोध निवड -
भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ अजीत गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, एनसीपीकडून प्रफुल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राजस्थानातून सोनिया गांधी यांची बिनविरोध निवड -
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची राजस्थानातून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय, भाजपचे चुन्नीलाल गरासिया आणि मदन राठोड यांचीही राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने विधानसभा सचिव महावीर प्रसाद शर्मा यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कुठलेही नवे नामांकन आले नाही. यामुळे हे तीनही नेत्यांची राज्यसभेसाटी बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाची म्हणजे, उच्च सभागृहात बसण्याची सोनिया गांधी यांची पहिलीच वेळ असणार आहे.

गुजरातमधून जे पी नड्डा राज्यसभेवर -
याच बरोबर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची गुजरातमधून राज्यसभेसाठी निवड झाली आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपमध्ये गुजरातचे महत्व पूर्वीच्या तुलनेत खूप अधिक वाढताना दिसत आहे.

मध्य प्रदेशातून या नेत्यांची निवड -
मध्य प्रदेशातून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यात भाजपचे एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नारोलिया, बंसीलाल गुर्जर, तर काँग्रेसचे अशोक सिंह यांचा समावेश आहे. यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
 

Web Title: Election of 6 people from Maharashtra to Rajya Sabha unopposed before polling; Sonia Gandhi from rajasthan and jp Nadda from gujrath also became Rajya Sabha MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.