शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बरेलीची बर्फी कोणाचे तोंड करणार गोड? ‘झुमका गिरा रे’ गाण्यामुळे देशात प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 13:10 IST

बरेली प्रदेशच्या साधारण मध्यावर असलेला हा जिल्हा. राज्याची राजधानी असलेला लखनौ आणि देशाची राजधानी असलेली दिल्ली यांच्याबरोबर मध्यावर हे शहर वसले आहे. 

मनोज मुळ्ये -बरेली (उत्तर प्रदेश) : ‘झुमका गिरा रे’ म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेल्या बरेलीतील सत्तेची बर्फी यावेळी कोणाचे तोंड गोड करणार, याची मोठी उत्सुकता आहे. गत निवडणुकीत या जिल्ह्यातील नऊच्या नऊ जागा जिंकणाऱ्या भाजपने ही सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे प्रदेश स्तरावरील नेते सातत्याने या भागात प्रचार करत आहेत.

बरेली प्रदेशच्या साधारण मध्यावर असलेला हा जिल्हा. राज्याची राजधानी असलेला लखनौ आणि देशाची राजधानी असलेली दिल्ली यांच्याबरोबर मध्यावर हे शहर वसले आहे. 

झुमका गिरा रे या गाण्यामुळे करमणुकीच्या जगात प्रसिद्धी पावलेला हा भाग बर्फीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. १९९० पूर्वी औद्योगिकीकरणामुळे हा भाग संपन्न झाला. मात्र, ९० नंतर अनेक कारखाने बंद झाले. ऊस, गहू, भात आणि कडधान्याची लागवड या भागात खूप आहे.

हिंदूबहुल वस्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सक्रिय सहभागामुळे १९८५ सालच्या विधानसभा या निवडणुकांपासून हा भाग सतत भाजपच्याच ताब्यात राहिला आहे. त्यामुळे याहीवेळेस या नऊही जागांवरील ताबा कायम ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

...हम उनको लाएंगेयावेळेच्या निवडणुकांमध्ये ‘वो राम को लाये है, हम उनको लाएंगे’ हे वाक्य इथल्या मतदारांना अधिक आकर्षित करणारे ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी दुपारच्या सत्रात बरेलीमध्ये व्हर्च्युअल रॅली होती. शहरातच सायंकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोड शोच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. त्याचवेळी भाेजीपूर भागात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारात भाग घेतला.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ