इचलकरंजी बार असोसिएशनची निवडणूक २१ जून रोजी ; निवडणूक कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: May 12, 2014 16:40 IST2014-05-12T16:40:10+5:302014-05-12T16:40:10+5:30

इचलकरंजी बार असोसिएशनची निवडणूक २१ जून रोजी ; निवडणूक कार्यक्रम जाहीर
>इचलकरंजी : येथील बार असोसिएशनचा वार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २१ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. एम. बी. कणसे व ॲड. जे. एम. बैरागदार यांची निवड करण्यात आली आहे.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार यासह नऊ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : उमेदवारी अर्ज स्वीकारणे ११ जून ते १३ जून, छाननी १६ जून, पात्र उमेदवारांची यादी त्याचदिवशी प्रसिद्ध, माघार १७ जून दुपारी ४ वाजेपर्यंत, त्याचदिवशी दुपारी ५ वाजेपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २१ जून रोजी मतदान होणार असून, लगेचच मतमोजणी होणार आहे. असोसिएशनमधील सुमारे १८८ वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सत्तारूढ गटाबरोबरच प्रतिस्पर्धी गटाकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)