निवडणुकीच्या तारखा पुढच्या आठवड्यात?
By Admin | Updated: August 25, 2014 04:16 IST2014-08-25T04:16:59+5:302014-08-25T04:16:59+5:30
महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग पुढील आठवड्याच्या मध्यात जाहीर करण्याची शक्यता आहे

निवडणुकीच्या तारखा पुढच्या आठवड्यात?
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग पुढील आठवड्याच्या मध्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.
हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ येत्या २७ आॅक्टोबरला आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेंबरला संपत आहे.
झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढल्यावर्षी ३ जानेवारी आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ १९ जानेवारीला संपत आहे.
गणेशचतुर्थी, दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वाचे सण आणि त्यादरम्यान केंद्रीय दलांची तैनाती याचा विचार करून तारखा निश्चित करण्यात येणार आहेत.
पुढच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी असणार आहे. झारखंड हे नक्षलग्रस्त राज्य आहे. सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता आहे. या बाबींचा आणि निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षा दलांची नियुक्ती यांचा विचार करून या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होणार असलेल्या राज्यांचा आढावा घेण्याचे आदेश आधीच दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)