शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

निवडणूक आयोगाचे आदेश धाब्यावर!

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

अजब तर्‍हा : मौलाना आझाद संशोधन निवडणूक केंद्रावरील प्रकार

अजब तर्‍हा : मौलाना आझाद संशोधन निवडणूक केंद्रावरील प्रकार
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला मालमत्तेसंबंधी सविस्तर विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रत्येक उमदेवाराच्या मालमत्तेचे विवरणपत्र कार्यालयाच्या परिसरात प्रसिद्ध करावे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. मात्र, मौलाना आझाद संशोधन केंद्रावर एकाही उमेदवाराच्या मालमत्तेसंबंधीचे विवरण प्रसिद्ध करण्यात आले नाही, हे विशेष.
रोजाबाग, भारतमातानगर (वॉर्ड-१०), विश्वासनगर, हर्षनगर (११), पहाडसिंगपुरा, बेगमपुरा (१२), आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी (१९), जयभीमनगर, घाटी रुग्णालय परिसर (२०), बुढीलाईन, कबाडीपुरा (२१), लोटाकारंजा (२२), चेलीपुरा, काचीवाडा (२३), गणेश कॉलनी (२५), नेहरूनगर (२६), शताब्दीनगर (२७), स्वामी विवेकानंदनगर (२८) या वॉर्डांतील उमेदवारांचे मजनू हिल येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रावर अर्ज स्वीकारण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर १२ वॉर्डांमध्ये १०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराच्या मालमत्तेसंबंधीचे विवरणपत्र प्रसिद्ध करण्याचे आदेश यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी यासंबंधीची कोणतीही तसदी घेतली नाही. उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील दाबून ठेवण्यात अधिकार्‍यांचा नेमका काय हेतू आहे, असाही प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
पत्रकार कक्षच गायब
मौलाना आझाद संशोधन केंद्रात निवडणुकीसंबंधी वेळोवेळी माहिती देण्यासाठी पत्रकार कक्षच स्थापन करण्यात आलेला नाही. वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांकडे कोणत्याही माहितीची मागणी केली, तर कानावर हात ठेवण्यात येतात. निवडणुकीच्या कामासंबंधी प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत आहे.