निवडणूक आयोगाची मोठी तयारी! पॅन कार्ड सारखेच मतदान कार्डही आधारसोबत लिंक करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 17:26 IST2025-03-15T17:23:49+5:302025-03-15T17:26:50+5:30

पॅन कार्डप्रमाणेच, आता निवडणूक आयोग मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करणार आहे.

Election Commission's big preparation Just like PAN card, voting card will also be linked with Aadhaar | निवडणूक आयोगाची मोठी तयारी! पॅन कार्ड सारखेच मतदान कार्डही आधारसोबत लिंक करणार

निवडणूक आयोगाची मोठी तयारी! पॅन कार्ड सारखेच मतदान कार्डही आधारसोबत लिंक करणार

काही महिन्यापूर्वीच पॅन कार्ड आधारकार्ड सोबत लिंक करण्यात आले होते. आता या पद्धतीनेच मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याची तयारी निवडणूक आयोग तयारी करत आहे. निवडणुकीतील पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने, मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची प्रक्रिया आता जलद करण्यात येणार आहे. 

या संदर्भात आता निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे, यामध्ये गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि  UIDAI चे उच्च अधिकारी सहभागी होतील. या उपक्रमाचा उद्देश बनावट आणि नकली मतदार ओळखून मतदार यादी काढण्याचा आहे. 

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, २०२१ मध्ये लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मध्ये सुधारणा केल्यानंतर, निवडणूक आयोगाने मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यास सुरुवात केली. निवडणूक आयोगाने अद्याप आधार आणि मतदार ओळखपत्र डेटाबेस लिंक केलेले नाहीत. डुप्लिकेट मतदार नोंदणी ओळखून मतदार यादीतील बनावट नावे काढण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण ती आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आले नव्हते.

पुढच्या आठवड्यात बैठक होणार

या मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी १८ मार्च रोजी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, विधिमंडळ विभागाचे सचिव राजीव मणी आणि यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांची बैठक होणार आहे. काही दिवसापूर्वी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये मतदारांचा EPIC क्रमांक समान असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर आता ही बैठक होत आहे. 

'ज्या मतदारांना डुप्लिकेट EPIC नंबर दिला आहे. त्यांना पुढच्या तीन महिन्यात एक नंबर दिला जाणार आहे, असं निवडणूक योगाने सांगितले होते.  समान EPIC क्रमांक असल्याने मतदार बनावट आहेत असा अर्थ होत नाही, परंतु मतदार फक्त ज्या मतदारसंघात नोंदणीकृत आहे तिथेच मतदान करू शकतो.

Web Title: Election Commission's big preparation Just like PAN card, voting card will also be linked with Aadhaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.