शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

क्लीन चिटवरून निवडणूक आयोगामध्ये फूट? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 17:42 IST

सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे.

नवी दिल्ली -  सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना निवडणूक आचारसंहिता भंगप्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यावरून हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगातील सर्व सदस्यांचे सर्वच बाबतीत एकमत असण्याची आवश्यकता नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी म्हटले आहे. मोदी आणि अमित शहा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. या वृत्तानुसार निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांना एक पत्र लिहिले असून, तीन निवडणूक आयुक्तांपैकी कुणाचेही कुठल्याही मुद्यावर वेगळे मत असल्यास संबंधित आदेशामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असावा असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चिट देण्याच्या मुद्द्यावर अशोक लवासा हे  अन्य दोन निवडणूक आयुक्तांसोबत असहमत होते. तसेच आपले विरोधी मत रेकॉर्डमध्ये नमूद करावे, असे त्यांचे मत होते. तसेच आपल्या मताप्रमाणे व्यवस्था होईपर्यंत आपण निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. हा विवाद टाळता आला असता, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच सर्व मुख्य निवडणूक अधिकारी आणि त्यांची पथके रविवारी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आणि 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीत गुंतले असताना हा विवाद समोर आला आहे. सार्वजनिकरीत्या होणाऱ्या वादविवादांना माझा विरोध नाही. मात्र प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा