गुजरात इलेक्शन ड्युटी लागली, IAS अधिकाऱ्याने कारसोबत पोझ दिली, निवडणूक आयोगाने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 11:04 IST2022-11-19T10:59:09+5:302022-11-19T11:04:32+5:30
निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या एका IAS अधिकाऱ्याला सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे महागात पडले आहे. गुजरात निवडणुका सुरू झाल्या आहेत.

गुजरात इलेक्शन ड्युटी लागली, IAS अधिकाऱ्याने कारसोबत पोझ दिली, निवडणूक आयोगाने घेतली दखल
निवडणूक निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या एका IAS अधिकाऱ्याला सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे महागात पडले आहे. गुजरात निवडणुका सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत आयएएस अधिकारी अभिषेक सिंह या अधिकाऱ्यांना पर्यवेक्षकपद दिले होते, पण, अधिकाऱ्याच्या एक चुकीमुळे दुसऱ्याच दिवशी त्यांना आयोगाने पदावरुन हटवले आहे.
गुजरातच्या बापूनगर आणि असर्वा विधानसभा मतदारसंघाचे जनरल ऑब्झर्व्हर पद स्वीकारल्यानंतर सिंह यांनी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर काही फोटो शेअर केली, ज्यामध्ये ते त्यांच्या कारसोबत पोज देताना दिसत आहेत. यासोबतच त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटवर लाल रंगात ऑब्झर्व्हर असे लिहिलेले दिसत आहे.
Shraddha Murder Case :'मारहाणीमुळे अंथरुणावरून...; श्रद्धाच्या नव्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
अशाच आणखी एका फोटोमध्ये तो त्यांचे अंगरक्षक आणि इतर अधिकाऱ्यांसोबत पोज देताना दिसत आहेत. हा पब्लिसिटी स्टंट मानून निवडणूक आयोगाने त्यांना तात्काळ पदावरून हटवले आणि त्यांना मतदारसंघ सोडून नोडल ऑफिसरला अहवाल देण्यास सांगितले. अभिषेक सिंग यांनी आपल्या अधिकृत पदाचा वापर प्रसिद्धी स्टंटसाठी केल्याचे आयोगाने म्हटले आहे.
सिंग हे उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाचे फोटो त्यांच्या पेजवर उपलब्ध आहेत.
Joined Ahmedabad as Observer for Gujarat Elections#Election2022#GujaratElections2022#NoVoterTobeleftBehindNovemberpic.twitter.com/VRHUfxuqCI
— Abhishek Singh (@Abhishek_asitis) November 17, 2022
कृष्णा बाजपेयी, 2010 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे अधिकारी आता बापूनगर आणि असरवा येथे निरीक्षक म्हणून काम पाहतील. अभिषेक सिंह यांना तातडीने विधानसभा सोडून परत जाण्यास सांगण्यात आले आहे.
पुढील आदेशापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची निवडणूक जबाबदारी किंवा कर्तव्यावर न ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याची माहिती आहे.