शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:33 IST

प्रत्येक राज्यातील रिक्त राज्यसभेच्या जागांची संख्या आणि आमदारांची संख्या यावर एका उमेदवाराला जिंकण्यासाठी किती मतांची गरज असते ते ठरते

नवी दिल्ली - राज्यसभेच्या ८ जागांसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. तामिळनाडू ६ आणि आसामध्ये २ जागा जून, जुलैमध्ये रिक्त होत आहे. ज्यासाठी १९ जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी केली जाईल. राज्यसभा निवडणुकीसाठी २ जूनला अधिसूचना जारी केली जाईल. ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दिली जाईल. राज्यसभा निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक लोकसभा, विधानसभा, पंचायत अथवा इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असते. 

राज्यसभेची मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीचे गणित वेगळे असते. प्रत्येक राज्यातील रिक्त राज्यसभेच्या जागांची संख्या आणि आमदारांची संख्या यावर एका उमेदवाराला जिंकण्यासाठी किती मतांची गरज असते ते ठरते. तामिळनाडूबाबत बोलायचे झाले तर एका उमेदवाराला जिंकण्यासाठी ३४ मतांची गरज आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण २३५ जागा आहेत आणि २३४ आमदार आहेत. या राज्यात सत्ताधारी द्रविड मुनेत्र काषगम पक्षाकडे १३३ आमदार आहेत. काँग्रेसकडे १७, वीसीकेकडे ४ आणि डाव्या पक्षांकडे ४ आमदार आहेत. विरोधी पक्ष एआयडिएमकेकडे ६६ आमदारांसह भाजपाचे ४ आमदार आहेत. 

तामिळनाडूत ६ राज्यसभेच्या जागांपैकी ३ डिएमकेकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ३४ मतांची गरज आहे. डिएमके आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे एकूण १५८ मते आहेत. त्यामुळे ४ जागांवर त्यांचा विजय पक्का आहे. एआयडिएमके एका जागेवर सहज विजयी होईल परंतु दुसऱ्या जागेसाठी त्यांना भाजपाच्या ४ मतांची गरज आहे. त्यामुळे एका जागेवर तामिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे मात्र AIDMK सोबत त्यांच्या संबंधामुळे त्यांचा राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग सोपा नाही.

आसाममधील दोन्ही जागा भाजपा जिंकणार?

आता आसामबाबत बोलाल तर इथं विधानसभेच्या एकूण १२६ जागा आहेत. ज्यात भाजपाकडे ६४ आणि सहकारी पक्षाकडे १६ जागा आहेत. त्यामुळे भाजपा आघाडीचं संख्याबळ ८० इतके आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४३ मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपाचा एका जागेवर विजय निश्चित आहे परंतु दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांना २२ मतांची गरज आहे. जर भाजपाच्या मित्रपक्षांचा १६ आकडा पकडला तरी ३६ मते त्यांच्याकडे आहेत. त्यांना ६ अतिरिक्त मतांची गरज भासेल. दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसकडे २६, सीपीआय १, एआययूडिएफकडे १५ आणि बोडोलँडकडे ३ आमदार आहेत. जर या पक्षांनी काँग्रेसला साथ दिली तर त्यांचे संख्याबळ ४५ इतके होते. त्यामुळे राज्यसभेची दुसरी जागा ते जिंकू शकतात. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग